भूम परंडा : परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरवात झाली असून सर्वच पक्षांचे उमेदवार मलाच तिकीट मिळणार या आशेवर दौरे करत आहेत. परंडा मतदारसंघ हा तीन तालुक्यांचा मिळून असून हा मतदारसंघ कायम विकासापासून दूर असलेला दुष्काळी भागातील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.
बैंक प्रशासन अॅक्शन म मतदारसंघातील काही युवक विविध शहरांमध्ये व्यवसाय करत आहेत. व्यवसाय करून आपणही परंडा मतदारसंघाचे आमदार होऊ शकतो, म्हणून उमेदवारीसाठी व आमदार होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंडा मतदारसंघात हा नवीन ट्रेंड तयार होत असून मतदारसंघामध्ये विविध पक्ष-संघटना यांच्या माध्यमातून उमेदवारीसाठी ते प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे.
तिन्ही तालुक्यांमध्ये रोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी कोणत्याच आमदारांनी विशेष उद्योग उभारले नाहीत व उपलब्ध करून दिला आमदारकीचे स्वप्न नाही. परंतु, बघण्यात मात्र भावी आमदार सध्या तर्कवितर्क लावत आहेत. विधानसभा निवडणूक लागली की शेतकऱ्यांचे- तरुणांचे आम्हीच कैवारी असे म्हटले जाते . परंतु, वास्तवात मात्र एकदा निवडणूक पार पडली की शेतकरी व तरुण बेरोजगार यांच्या हाती मात्र पुढील पाच वर्षे निराशाच येते.
परंडा मतदारसंघात उच्च शिक्षणासाठी असे कोणतेही मोठे महाविद्यालय किंवा कॉलेज नाही. विद्यार्थ्यांना इतर शहरात शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधीने शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करतो, असे बोललेले सुद्धा नाही.
सध्या नवीन विद्यार्थी मतदार गोष्टीकडेही लक्ष देत आहेत. कारण विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात शिक्षण घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना आर्थिक समस्येला सामोरे लागत आहे. परंडा मतदारसंघ तीन तालुक्यांचा मतदारसंघ असल्यामुळे तिन्ही मतदारसंघांतील तरुण नवमतदार शिक्षणाच्या असणाऱ्या आपापल्या तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल.
अशाच लोकप्रतिनिधीच्या बाजूने नवमतदार जाईल, असे विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे. मात्र, या मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा मोठा एकही उद्योग अध्यापपर्यन्त आणण्यात कोणत्याच लोकप्रतिनिधीला यश आलेले नाही. कायम दुष्काळग्रस्त म्हणून लागलेला डाग पुसण्यास लोकप्रतिनिधींना यश मिळेल का, याकडे परंडा मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#Electionwithsakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.