बीड : औरंगजेब व टिपू सुलतान यांचे स्टेटस ठेवण्यावरून राज्यातील अनेक शहरांमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान औरंगजेबाची स्तुती करणार पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एका १४ वर्षीय मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या पोस्टमुळे आष्टी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी शुक्रवारी शहरात बंद पुकारला होता. ही पोस्ट पोस्ट तरुणाने नंतर हटवली.
तीन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे औरंगजेबाचे पोस्टर्स झळकल्यानंतर तसेच आणि कोल्हापुरात सोशल मीडिया स्टेटसमुळे हिंसाचार उसळला होता. ही बाब लक्षात घेऊन आष्टी पोलिसांनी सध्या शहराबाहेर असलेल्या तरुणाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
गुरुवारी या तरुणाने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही स्थानिक रहिवाशांनी ही व्हिडीओ क्लिप शेअर करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला, असे पोलिसांनी सांगितले.
पोस्ट डिलीट केली पण...
परिस्थिती लक्षात येताच, या मुलाने पोस्ट डिलीट केली आणि काही लोकांच्या अनवधानाने भावना दुखावल्याबद्दल माफी मागणारी दुसरी पोस्ट शेअर केली. एसपी नंद कुमार ठाकूर यांनी याबद्दल माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की, आम्ही किशोरवयीन मुलाविरुद्ध त्याच्या पोस्टसाठी एफआयआर नोंदवला आहे, जी नंतर हटवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
पोलिसांनी मुलाच्या नातेवाईकाशी देखील संपर्क साधला आणि त्यांना सोशल मीडिया पोस्ट आणि एफआयआरबद्दल माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगा शहरात परतल्यावर त्याला ताब्यात घेतले जाईल. तसेच मुलांसाठी असलेल्या सुधारगृहात रिमांडसाठी त्याला बालकल्याण कमिटीसमोर हजर केले जाईल. तसेच पोलिसांनी सांगितले की, बंद दरम्यान शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही, या दरम्यान बहुतेक व्यापार आणि व्यवसाय बंद राहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.