ausa sakal
मराठवाडा

औसा: अवैध धंदे करणाऱ्यांचे अगोदर पुनर्वसन करा

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती काढणार पोलिस ठाण्यावर पाचशे महिलांचा मोर्चा

जमील पठाण

औसा : भादा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ४५ गावात अवैध दारू विक्री, गुटखा, गांजा विक्री व मटका, जुगार जोरात सुरू असून दारूच्या नशेत खून, मारामाऱ्या झाल्या आहेत. हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर भादा स्टेशनच्या अधिकाऱ्याला भेटले असता त्यांनी या अवैध धंदेवल्यानी धंदे बंद केले तर जगायचे कसे? त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार? त्यांचे अगोदर पुनर्वसन करा असा अजब सल्ला दिल्याने या अधिकाऱ्याच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या अवैध धनेवाल्यांना पोलिसांचे अभय असल्याने गावागावात अवैध धंदे बिनबोभाट सुरू आहेत. यासाठी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता.३) सप्टेंबरला भादा प्राथमिक आरोग्य केंद्र ते पोलीस स्टेशन पाचशे महिलांना घेऊन मोर्चा काढण्यात येणार असून यात ४५ गावातील महिला सहभागी होणार असल्याचे खंडापुरकर यांनी मंगळवारी येथील विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकात परिषदेत सांगितले.

जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची कमान हाती घेतल्यावर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर फास आवळला. स्थानिक पोलिसांकडून म्हणावे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने त्यांनी विशेष पथकांची स्थापना करून छापेमारी सुरू केली. मात्र त्यांच्या या कार्याला गालबोट लावण्याचे काम भादा पोलिसांकडून होत असल्याचा आरोप करून खंडापुरकर म्हणाले की, भादा पोलिसांना अनेक गावातील लोकांनी निवेदने दिली, आंदोलने केली मात्र पोलीस या अवैध धंदे करणाऱ्या विरोधात कसलीच कारवाई करीत नाहीत.

उलट येथील सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब लिंगे यांनी आम्हाला या अवैध धंदेवल्यानी जगावे कसे? त्यांचे पुनर्वसन करा असा अतार्किक सवाल केला. हे निंदनीय असून बोकाळलेला या अवैध धंद्या विरोधात या ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातून ५०० महिला ३ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहेत..

पोलीस अधिकाऱ्याला महिला देणार आगळी वेगळी भेट

येथील पोलीस अधिकाऱ्यांना रोज मरणाऱ्या गरीब लोकांची काळजी नसून अवैध धंदे चालविणाऱ्याची काळजी आहे. हे केवळ आर्थिक हितसंबंध जपण्यासाठीच असल्याने मोर्चात सहभागी महिला एक दुरडी त्यामध्ये एक कोंबडे, दारूची बाटली आणि खर्चासाठी दहा हजार रुपये पोलीस अधिकाऱ्याला भेट म्हणून देणार असल्याचे समितीच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. सोनाली गुलबिळे यांनी सांगितले.

यावर भादा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब लिंगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मी असे कांहीच म्हणालो नाही. आम्ही विविध ठिकाणी धाडी टाकून अवैध धंदेवाल्यांवर कायदेशीर कारवाई करीत आहोत. हे आत्ताच नव्हे तर माझ्या पदभार घेतलेल्या दिवसापासून सुरू आहे. कोणालाही आमचे अभय नाही. कायदा मोडेल त्याला पोलीस आपल्या पद्धतीने कारवाई करीत आहेत व करतील असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT