परभणी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार व रविवार दोन दिवस परभणी जिल्ह्यातील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन वाघमारे यांचे पथक संपूर्ण हद्दीत फिरून लोकांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. ज्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसेल त्या ठिकाणी पोलिस स्वताजावून त्यांना आप - आपल्या घरी जाण्याची विनंती करत आहेत. परंतू, शहराच्या अनेक भागात शनिवारी (ता.२१) बेजबाबदारपणाचे दर्शन घडले. जमावबंदीचे आदेश असतांना काही नागरिक मात्र, अनेक ठिकाणे समुहाने वावरत असल्याचे दिसून आले.
राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असून या विषाणून चार बळी घेतले तर कित्येकांना बाधीत केले आहे. राज्य शासन अतिशय गांभीर्याने दररोज मोठमोठे निर्णय घेत असून त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे काम जिल्हा प्रशासन तातडीने करीत असून तशा सूचना, आदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचतील, अशी व्यवस्था करीत आहे. शहरातदेखील कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले नसले तरी विलगीकरण व अलगीकरण कक्षात असलेल्या संशयीतांची संख्या ४४ वर पोचलेली. अनेकजण देशाच्या विविध भागांसह परदेशातून देखील शहरात दाखल झालेले आहेत.
शहरात बेजबाबदारपणाचा कळस...
जिल्हा पातळीवर देखील जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महापालिका शासनाच्या दररोजच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजाणीचे प्रयत्न करीत आहे. परंतु शासन आदेश, प्रशासनाचे आवाहनांची पायमल्ली करण्याची स्पर्धाच जणू शहरात सुरु आहे. त्या अंतर्गत प्रशासनाने शहरातील विविध समुहांच्या, जाती-धर्मांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन एकाच ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अनेकांनी आपली प्रार्थनेस्थळे बंद केली.
हेही वाचा - कोरोना : मी तयार आहे तुम्ही तयार आहात ना?
हा विषाणू जात-पात, लिंगभेद काहीही पाहत नाही, याचे भान या बेजबाबदार नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे. शहराच्या मुख्य भाग जेथे पोलिस, प्रशासना वारंवार आवाहन करीत आहे, तो सोडला तर शहराच्या चोहोबाजूच्या वसाहतीत अनेक दुकाने खुली होती. रस्त्यावरील टपऱ्या, ढेले काही भागात दिसून येत होते व त्या ठिकाणी अशाच नागरीकांची देखील मोठी गर्दी देखील दिसून येत होती. असे व्यावसायीक दुसऱ्यांच्या आरोग्याशी तर खेळतच आहेत परंतु त्यांना स्वतःच्या आरोग्याची देखील काही काळजी असल्याचे दिसून येत नाही.
हेही वाचा -
चाबुक अन दंडात्मक कार्यवाहीच हवी का ?
प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्याची शहरात काही नागरिकांना सवयच जडलेली आहे. नियमबाह्य, असंविधानिक प्रकरणी कधी कार्यवाही झालीच तर समाज, राजकीय पाठबळ मिळवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. प्रशासनाने हातात चाबुक घेऊन कार्यवाही केली तर मग मात्र सुतासारखे सरळ होतात. परंतु सद्यस्थिती आणीबाणीची आहे. कोरोनाची आपत्ती ओढवू पाहात आहे. त्यासाठी स्वयंस्फुर्तीने प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. नेहमीची मुजोरी व अरेरावी अशा परिस्थितीत स्वतःच्या अंगलट येण्याचीच अधिक शक्यता आहे. प्रशासन जर हतबल झाले तर चाबुक व दंडात्मक कारवाईचा आसुड उगारल्याशिवाय राहणार नाही, याची अशा बेजबाबदार व निर्धावलेल्या मुठभर नागरीकांनी नोंद घ्यावी, स्वतःच्या दांभीकपणासाठी शहराला वेठीस धरू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नाभिक समाजाचा असाही आदर्श
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखेने ता. २१ ते २३ मार्च दरम्यान आपआपली केशकर्तनालये बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. प्रदेश अध्यक्ष कल्याण दळे व उपाध्यक्ष तथा महानगरपालिकेचे उपमहापौर भगवान वाघमारे यांनी केलेल्या आवाहनाला सर्व समाजाने पाठींबा देऊन व देशहितासाठी हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष संपत सवने, सचिव शाम साखरे, गंगाधर प्रधान, गोविंद भालेराव, वसंत पारवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी (ता.२१) शहरातील सर्व सलून देखील बंद होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.