state minister Bachchu kadu is in district 
मराठवाडा

बच्चू कडूंच्या प्रहारचा महाविकास आघाडीला फटका, चाकूर नगरपंचायतीत सत्ता कोणाची?

चाकूर नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल जाहीर आहे.

प्रशांत शेटे

चाकूर (जि.लातूर) : नगरपंचायत निवडणुकीत (Chakur Nagarpanchayat Election) राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने सहा जागा मिळवित आठ जागा मिळविलेल्या महाविकास आघाडीला सत्तेपासून लांब ठेवले आहे. यात भाजपच्या तीन जागा सत्तेसाठी निर्णायक ठरणार आहेत. नगरपंचायतीच्या १७ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), भाजप, प्रहार जनशक्ती पक्ष (Prahar Janshakti Party) व वंचित बहुजन आघाडीत चौरंगी लढत झाली होती. बुधवारी (ता.१९) सकाळी उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली. यात प्रभाग एकमधून भाजपच्या सुजाता रेड्डी (३९४), प्रभाग दोनमधून भाजपचे साईप्रसाद हिप्पाळे (३६६), प्रभाग तीनमधून प्रहार जनशक्ती पक्षाच्या हिरकणा लाटे (३४५), प्रभाग चारमधून भाजपचे अरविंद बिराजदार ९२२८), प्रभाग पाचमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुज्जमील सय्यद (३१२), सहामधून प्रहारच्या वैशाली कांबळे (३२९), सात मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाबाना सय्यद (४९४), आठमधून प्रहारच्या शहाबानो सय्यद (१९२), नऊमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती स्वामी (३२१), दहामधून प्रहारच्या शुभांगी कसबे (३३३), अकरामधून काँग्रेसच्या गंगुबाई गोलावार (३३८), बारा प्रहारच्या कपिल माकणे (२८९), तेरा काँग्रेसच्या गोदावरी पाटील (२७६), चौदा राष्ट्रवादी काँग्रेसचे करीम गुळवे (३२५), पंधरा राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद महालिंगे (२४५), सोळा काँग्रेसचे भागवत फुले (४३८), सतरा प्रहार जनशक्ती पक्षाचे अभिमन्यु धोंडगे (४५०) हे विजयी झाले आहेत. (Bachchu Kadu's Prahar Party Hit Mahavikas Aghadi In Chakur Nagarpanchayat Election)

राज्यमंत्री बच्चु कडू (Bachchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने मराठवाड्यात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सहभाग घेऊन सहा जागेवर विजय मिळवीला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीला एक जागा कमी पडत असून प्रहारला तीन जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपचे तीन नगरसेवक ज्या बाजूने जातील त्याची सत्ता होणार आहे. (Latur News)

माजी नगराध्यक्षाच्या चिठ्ठीमधून विजय

प्रभाग पंधरामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे व प्रहार जनशक्ती पक्षाचे धोंडीराम पौळकर या दोघांना २४४ समसमान मते पडली होती. यात चिठ्ठी काढली असता महालिंगे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी फुलारी यांनी महालिंगे यांना विजयी घोषित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT