bajrang sonawane criticize amol mitkari Sakal
मराठवाडा

Beed News : मिटकरींनी ग्रामपंचायत सदस्य निवडून आणावा मग बोलावे; खासदार बजरंग सोनवणे यांचा टोला

मिटकरी यांनी केलेल्या ट्विटनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का?

सकाळ वृत्तसेवा

Beed News : ‘बीडच्या बप्पाचा दादांना फोन’ असे टविट् करणाऱ्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ‘त्यांनी एखादा ग्रामपंचायत सदस्य तरी निवडून आणावा’, असा टोला लगावला आहे. आपण मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहू, असेही सोनवणेंनी स्पष्ट केले.

मिटकरी यांनी केलेल्या ट्विटनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर बजरंग सोनवणे यांनी स्पष्टीकरण देत, मी मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार, असं स्पष्ट केलं. अमोल मिटकरी यांनी लोकसभेमध्ये किमान एखादा खासदार निवडून आणायला हवा होता.

त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच्या बाबतीत बोलावं. असे संभ्रम निर्माण करण्याचे प्रकार अमोल मिटकरी यांनी बंद करावेत, त्यांनी आधी एखादा ग्रामपंचायतचा सदस्य निवडून आणावा, असा टोलाही लगावला.''मी फोन करण्याचा संबंध कुठे येतो.

ते असा संभ्रम का पसरवत आहेत, हे त्यांनाच विचारायला हवं. मिटकरी थेट आमदार झालेत, त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावं आणि त्यानंतर दुसऱ्यांना बोलावे, असा टोलाही बजरंग सोनवणे यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT