पाथरी (जिल्हा परभणी) : शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने सेवा करणाऱ्या पाथरी बाजार समितीने (Pathari apmc) कोरोना महामारीत कोरोनाग्रस्त शेतकरी व नागरीकांसाठी कोवीड सेंटर (covid center) सुरु करुन देवदूताची भुमीका स्विकारली असल्याचे गौरवद्गगार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb patil)यांनी बुधवारी (ता. १२) रोजी काढले. (Devdut-Balasaheb Patil becomes Pathri Bazar Samiti for coronary farmers)
पाथरी शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामीण रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय ईमारतीत सर्व सोईयुक्त 50 बेडचे मोफत कोविड केअर सेंटर उभारले त्याचे उद्घाटन ता. 12 मे रोजी साडेअकरा वाजता आँनलाईन पध्दतीने सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री नवाब मलीक, कृषीमंत्री दादासाहेब भुसे व पणन संचालक सतिश सोनी यांनी आँनलाईन उपस्थिती दर्शवत सदर कोवीड सेंटरला शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा - रमजान ईद घरीच साजरी करा- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
यावेळी बोलतांना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, दुसऱ्या लाटेतील रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू दर ही चिंताजनक बाब आहे. यासाठी आरोग्य, महसूल व पोलीस यंत्रना पुर्ण क्षमतेने कार्यरत आहे. यामध्ये सहकार विभागातील उत्तम कामकाज असणाऱ्या बाजार समीतीने मोफत कोवीड सेंटर करीता पुढाकार घेण्याचे आवाहन शासनाने केले होते. यास तातडीने प्रतिसाद देणारा परभणी जिल्हा पहिल्या स्थानावर आहे. जिल्ह्यात बाजार समितीच्या वतीने मानवत, सेलू, जिंतूर आणि पाथरी येथे मोफत कोवीड सेंटर सुरु करुन शेतकऱ्यांच्या आरोग्याप्रती सामाजिक दायित्व स्विकारले याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करीत आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे विशेष कौतुक केले. व या कोवीड सेंटरमधून रुग्णांना मोकळ्या वातावरण व सकस आहार व औषधोपचार द्यावा व मनोरंजन केले तर रुग्णांच्या मनातील भित्ती कमी होईल व रुग्ण बरे होतील याबाबत त्यांनी संयोजकांना सुचना केल्या.
याप्रसंगी पोलिस अधिक्षक जयंत मिना यांचे हस्ते फित कापुन या कोवीड सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर,आमदार बाबाजाणी दुर्राणी, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, उपजिल्हाधिएकारी सुदर्शन निकाळजे, तहसीलदार श्रीकांत निळे, सहाय्यक निबंधक माधव यादव, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, वैद्यकीय आधिक्षक डॉ. बी. टी. वाघ, तालूका आरोग्य आधिकारी डॉ. के. पी. चौधरी, गट शिक्षणाधिकारी मुकेश राठोड, मानवत बाजार समीती सभापती पंकज आंबेगांवकर,मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे, संयोजक बाजार समीतीचे सभापती अनिलराव नखाते, उपसभापती एकनाथराव शिंदे, संचालक माधवराव जोगदंड, सुरेश ढगे, लहु घांडगे, नारायणराव आढाव, विश्वांभर साळवे, बाबासाहेब कुटे, सय्यद गालेब, गंगाधरराव गायकवाड, अँड. मुंजाजी भाले, सुभाषराव कोल्हे, चक्रधर उगले, अशोकराव गिराम, विजय सिताफळे, अजय थोरे, नितिन शिंदे, डिगांबर लिपने, गजानन गलबे यांची उपस्थिती होती. या कोवीड सेंटरमध्ये सर्व सोईयुक्त 50 बेड आहेत तर वीज, शौचालय सुविधा आहे. रुग्णांना वैद्यकीय कर्मचारी यांचे देखरेखीखाली औषधोपचार व नाष्टा व दोन वेळा भोजन अशी व्यवस्था आहे. या कोवीड सेंटरमुळे शासकीय यंत्रनेवरील ताण कमी होणार आहे. सूत्रसंचालन गोपाळ आमले यांनी केले तर उपसभापती एकनाथराव शिंदे यांनी आभार मानले.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.