balasaheb thorat balasaheb thorat
मराठवाडा

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारे कुठे लपून बसले? थोरातांचा चिमटा

कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी वॉर्डा-वार्डात जा- बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत एक रुपयांची जरी वाढ झाली तरी भाजप नेते तेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. आता पेट्रोल-डिझेलच्या किमती शंभराच्या पुढे गेल्या आहेत. भाजप नेते आता कुठे जाऊन बसले आहेत? याचा शोध आम्ही घेत आहोत, असा चिमटा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी (ता. ३०) काढला. कॉंग्रेस मजबूत करायची असेल तर वॉर्डा-वॉर्डात जाऊन कमिटी स्थापन करा, अशा सूचना त्यांनी यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी शहागंज येथील गांधीभवनात कॉंग्रेसची आढावा बैठक घेतली. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश मुदिया, एम. एम. शेख, रवींद्र काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, भाऊसाहेब काका ठोंबरे, इब्राहिम पठाण, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, रामराव शेळके, जगन्नाथ काळे, अक्रम पटेल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला सीमा थोरात, जगन्नाथ खोसरे, शोभाताई खोसरे, संदीप बोरसे, अनिल श्रीखंडे, विजय मनाळ, जयप्रकाश नारनवरे, पप्पू ठुबे, मोहित जाधव, गौरव जयस्वाल, अतिश पितळे, सचिन शिरसाट, शुभम साळवे, बाळूशेठ गुजर, गजानन मते, विठ्ठल कोरडे, बबन कुंडारे, सुरेश शिंदे, संतोष शेजुळ, सर्जेराव चव्हाण. आनंद शिंदे, अनिल सोनवणे, बाबासाहेब मोकळे, श्याम बाबा गावंडे, प्रकाश जाधव, शिवाजी ढाकणे व पदाधिकारी उपस्थित होते.

कमिट्यांची नियुक्ती लवकरच
जिल्हा शासकीय कमिटी व तालुका शासकीय कमिटी व मंडळ लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी आठवड्यात औरंगाबादच्या शासकीय कमिट्या मार्गी लावव्या यासाठी मागणी करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma BGT: ... तर BCCI ने नवा कर्णधार नेमायला हवा, रोहितने खेळाडू म्हणून खेळावे; सुनील गावस्कर संतापले

Share Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 66.57 अंकांनी घसरला, निफ्टी 24,000च्या खाली

VIDEO : मित्रांचं जिवघेणं चॅलेंज! ऑटो रिक्षा जिंकण्यासाठी पेटलेल्या फटाक्यांवर बसला तरूण; धक्कादायक व्हिडीओ आला समोर

'धर्मवीर २' चा ओटीटीवर बोलबाला! मोडला परेश मोकाशींच्या 'वाळवी'चा रेकॉर्ड, एका आठवड्यात मिळाले तब्बल इतके विव्ह्यू

Weight Loss Tips : फराळावर ताव मारून वजन वाढलंय? लगेचच या गोष्टी बदला, वाढलेल्या कॅलरी जळून राख होतील

SCROLL FOR NEXT