मराठवाडा

Beed Constituency Lok Sabha Election Result: बीडमध्ये फिरली बजरंगाची गदा! पंकजा मुडेंचा चुरशीच्या लढतीत पराभव

Beed Lok Sabha Election Result 2024 ncp sp Bajrang Sonwane win : लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी बीडमध्ये काय होईल याची कमालीची उत्सुकता संपूर्ण राज्याला आहे. याचं कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिण एकत्र येणं आहे. बीड लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Beed Lok sabha election result 2024 : शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या बीडच्या निकालाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा थोडक्यात पराभव झाला. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे. निकालाच्या प्रत्येक फेऱ्यांमध्ये थ्रील आणि सस्पेन्स अनुभवायला मिळालेल्या या निवडणुकीत कधी पंकजा मुंडे तर कधी बजरंग सोनवणे आघाडी घ्यायचे. शेवटच्या काही फेऱ्या उरल्या तेव्हा २५ हजारांची लीड असलेल्या पंकजा मुंडे मागे पडल्या आणि बजरंग सोनवणे यांनी अखेर ६,५८५ मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला.

बजरंग सोनवणे- ६,८१,५६९

पंकजा मुंडे- ६,७४,९८४

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- ६,५८५

या निवडणुकीत राज्यासह देशाच लक्ष बीड मतदारसंघाकडे होते त्याच कारण म्हणजे मुंडे भाऊ बहिण एकत्र येणं आहे. बीड लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. कारण 2004 वगळता गेल्या आठ निवडणुकांमध्ये या ठिकाणी भाजपने सत्ता मिळवली होती. 2019 मध्ये प्रीतम मुंडे यांना भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला आणि पुन्हा एकदा प्रीतम मुंडे खासदार झाल्या.

2014 च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना जवळपास 7 लाखांची आघाडी होती. पण 2019 मध्ये 1 लाख 68 हजारांची आघाडी मिळाल्याचं चित्र होतं. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

2019 मध्ये प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं 90 हजारावर मतं घेतली होती. त्यावेळी झालेल्या निवडणुकीतधनंजय मुंडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेससाठी शक्ती पणाला लावली होती. त्यामुळं मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना दिसून आला, तर यावेळी राजकीय दृश्य वेगळे आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर गेल्यानं पंकजा आणि धनंजय मुंडेंना एकत्र आले आहेत.यावेळी धनंजय मुंडे स्वतः बहिणीसाठी प्रचार करताना दिसले.

बीड मतदारसंघाची रचना?

गेवराई विधासभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार (भाजप), माजलगाव विधासभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी अजित पवार गट), बीड विधासभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी शरद पवार), आष्टी विधासभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी अजित पवार), केज विधासभा मतदारसंघाचे आमदार नमिता मुंदडा (भाजप), परळी विधासभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे (राष्ट्रवादी अजित पवार गट)

बीडमध्ये राज्यात सर्वाधिक मतदान

बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता सुमारे 70.92 टक्के मतदान झाले. बीडमध्ये राज्यात सर्वाधिक मतदान झालं असल्याची नोंद समोर येते आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात 74.79 टक्के मतदानाची नोंद झाली. तर बीड 66.09 टक्के, गेवराई 71.43 टक्के, केज 70.31 टक्के, माजलगाव 71.61टक्के, परळी 71.31 टक्के विधानसभा मतदारसंघात मतदान झाले.

२०१९ चे चित्र

डॉ. प्रीतम मुंडे (भाजप) विजयी मते : ६,७८,१७५

बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ५,०९,८०७

प्रा. विष्णू जाधव (वंचित बहुजन आघाडी) मते : ९२,१३९

संपत चव्हाण (अपक्ष) मते : १६७९२

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : १,६८,३६८

वर्चस्व

२००४ : राष्ट्रवादी

२००९ : भाजप

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

निवडणुकीवर प्रभाव टाकणारे मुद्दे

सलग १० वर्षे सत्ता असून जिव्हाळ्याचा नगर- बीड- परळी रेल्वेमार्ग अपूर्ण, मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने सगोसोयरे, मराठा तरुणांवर गुन्हे आदी निर्णय प्रलंबित, पंकजा मुंडेंचा घटलेला संपर्क व त्यांचा बंद पडलेला साखर कारखाना, शेतकऱ्यांचे हमीभाव, सोयाबीनचे दर हे प्रश्नही, पाणी आणि वॉटरग्रीडचा प्रलंबित मुद्दा, त्याचबरोबर ऊसतोड मजुरांचा मुद्दाही बीडमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT