आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व गेवराई या तालुक्यांचा नगर जिल्ह्याशी संबंध असल्यानेच या तालुक्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याचे गणित बांधून या तालुक्यांत निर्बंध आणखी कडक केलेले आहेत
बीड: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभाव जिल्ह्यात कमी होताना दिसत नाही. शुक्रवारीही (ता. सहा) रुग्णसंख्या पुन्हा दोनशेंच्या पुढे (२१२) गेली. तर नवीन-जुन्या पाच कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंची नोंद झाली. जिल्ह्यात दुसऱ्या कोरोना लाटेचा प्रभाव अधिक होता. दुसरी लाट मे अखेरीस ओसरल्यानंतरही रोज आढळणारी रुग्णसंख्या एका विशिष्ट टप्प्यात कायम आहे. अलीकडे आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व गेवराई या तालुक्यांचा नगर जिल्ह्याशी संबंध असल्यानेच या तालुक्यांत रुग्णसंख्या वाढत असल्याचे गणित बांधून या तालुक्यांत निर्बंध आणखी कडक केलेले आहेत. तरीही आष्टी तालुक्यात रुग्णसंख्या घटण्याचे नाव घेत नाही. यातील गेवराई वगळता इतर तीन तालुक्यांच्या सीमांवर बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांची चेकपोस्टवर रॅपीड अँटीजेन तपासणीही केली जात आहे.
दरम्यान, गुरुवारी (ता. पाच) तब्बल ४,८२२ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. शुक्रवारी हाती आलेल्या अहवालांमध्ये २१२ लोकांना कोरोनाची बाधा असल्याचे निदान झाले. सर्वाधिक ५२ रुग्ण आष्टी तालुक्यात आढळले. त्यानंतर बीड तालुक्यात ४९ रुग्णांची नोंद झाली; तसेच अंबाजोगाईत पाच, धारूर सहा, गेवराई १३, केज सहा, माजलगाव १९, परळी दोन, पाटोदा १८, शिरूर १९, वडवणी २३ अशी रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची जिल्ह्याची रुग्णसंख्या तब्बल ९८ हजार ३८० झाली आहे. आतापर्यंत ९३ हजार ८३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, जिल्ह्यातील १,९१० रुग्ण जिल्ह्यात व बाहेर जिल्ह्यातील दवाखान्यांत उपचार घेत आहेत. दरम्यान, शुक्रवारी मागील २४ तासांतील चार व जुन्या एक अशा पाच कोरोनाबळींची नोंद झाली. आतापर्यंत २६३८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
‘म्युकर’च्या पाच रुग्णांना सुटी
कोरोना विषाणू संसर्गानंतर काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या म्युकरमायकोसिस या गंभीर आजारांच्या आणखी पाच रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. आता केवळ १३ रुग्ण उपचाराखाली असून, १४७ रुग्ण बरे झाले आहेत. ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१० रुग्ण आढळले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.