बीड - प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रपाळीला कर्तव्यावर असलेल्या सहकारी परिचारिकेला व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्या ५५ वर्षीय शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
हा प्रकार ता. पाच ऑगस्टला वडवणी तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. सय्यद अतिक सय्यद रफिक असे निलंबीत करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे.
सय्यद अतिक सय्यद रफिक हा शिपाई चार महिन्यांपूर्वी वडवणी तालुक्यातील एका आरोग्य केंद्रात बदलून गेला होता. ता. पाच ऑगस्ट रोजी त्याची प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रपाळीची ड्यूटी होती. याच वेळी एक कंत्राटी परिचारीकाही कर्तव्यावर होत्या. त्याने एकटी असल्याचा गैरफायदा घेत या परिचारिकेच्या व्हाटस्अपवर अश्लील मेसेज पाठविले.
हा प्रकार परिचारिकेने वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना कळविला. यानंतर संबंधीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करुन त्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांना दिला. डॉ. गंडाळयांनी हा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांना दिला.
श्री. पाठक यांनी सर्व बाजू तपासून घेत सय्यद अतिक सय्यद रफिक या शिपायावर निलंबनाची कारवाई केली. याची विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली असून, तोपर्यंत त्याला आष्टी पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे. यापूर्वीही त्याच्यावर एकवेळा निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.