death of woman after her scarf got caught in belt of flour mill navegaon bandh gondia
death  Sakal
मराठवाडा

Beed Crime: बीड हादरलं! अजित पवार गटाच्या सरपंचाची गोळी घालून हत्या, कारण आलं समोर

कार्तिक पुजारी

बीड- शहरातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. बीडच्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बापू आंधळे अजित पवार गटाचे समर्थक आहेत. ते कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे असल्याचं मानलं जातं. गोळीबारात आणखी दोघे जखमी झाले आहेत. हत्येमागचं कारण समजू शकलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे यांनी निवडणूक लढवली होती. मरळवाडी ग्रामपंचायतमध्ये आंधळे सरपंच झाले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. परळीमधील बँक कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी बाबू आंधळेंचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्याच्यावर पाच गोळ्या चालवण्यात आल्याची माहिती आहे.

ग्यानबा गीते हे जखमी झाले आहेत. याशिवाय बबन गीते यांचा सहकारी महादेव गीते यांना देखील गोळी लागली आहे. या दोघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. सदर प्रकारामुळे परळीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बबन गीते याने पैशाच्या वादातून बापू आंधळे यांच्यावर गोळीबार केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी बबन गीते याच्याविरोधात ३०२ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Exam: नीट परीक्षेत लातूरमध्ये दहा विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिले, इतर परीक्षांचाही होणार तपास; CBIचे अधिकारी ठाण मांडून

Team India Arrival Live Updates : भारतीय संघ पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल! काही वेळात होणार विशेष भेट

स्वागत नहीं करोगे... ढोलताशाच्या तालावर सूर्या अन् पांड्याने धरला ठेका; पोलीस बघतच राहिले... Video Viral

Bridge Collapse in Bihar: बिहारमध्ये पूल पडण्याच्या घटना का वाढल्या? सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल, चौकशीची मागणी

Vasant More: वसंत मोरेंचं ठरलं! लवकरच ठाकरे गटात प्रवेश; विधानसभेला 'या' जागेचं मिळणार तिकीट?

SCROLL FOR NEXT