Beed sakal
मराठवाडा

Beed: बीड जिल्ह्यातील 'हा' महत्त्वाचा रस्ता दोन ठिकाणी खचला, अपघाताचा धोका वाढला

सकाळ वृत्तसेवा

Latest Marathwada News: अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा-देवळा रस्तावर कोपरा शिवारात ओढ्याच्या पुलावर एक ठिकाणी मोठे भगदाड पडले असून देवळा शिवारात रस्ता खचला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. रस्ता खचून दोन महिने झाले तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला दुरुस्ती करण्यासाठी अजूनही मुहूर्त सापडलेला नाही.

धानोरा-देवळा रस्ता हा मोठ्या रहदारीचा आहे. परिसरात जून महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. या पावसाच्या पाण्याने नदी नाले ओढे ओसंडून वाहिले होते. धानोरा- देवळा रस्त्यावर दोन ठिकाणी ओढ्याचे पाणी रस्त्यावरून वाहिल्याने दोन ठिकाणी रस्ता खचला आहे.

खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी धोकादायक रस्ता आहे, असे वाहन चालकांना लक्षात यावे म्हणून शेजारील शेतकऱ्याने काटेरी झाडाच्या फांद्या आणि दगड लावण्याचे काम केले आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना स्थानिकांना रस्ता खचलेला माहिती आहे, परंतु नवीन प्रवासी वाहन आल्यास त्यांच्या लक्षात न आल्यास अपघात घडू शकतो. दोन महिने होत आले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. खचलेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी परिसरातील नागरिकांकडून मागणी होत आहे

धानोरा देवळा रस्ता खचल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे .वाहन चालकांना जवळ जाईपर्यंत हा रस्ता खचला आहे असे लक्षात येत नाही .रात्री या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे .या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी.

- सिद्धेश्वर साबळे, धानोरा खुर्द, ता.अंबाजोगाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

Sports Bulletin 5th Oct 2024 : मुंबईने २७ वर्षांनी जिंकला इराणी चषक ते भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलचे समीकरण, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT