Farmer Letter  Sakal
मराठवाडा

मला काळजीवाहू मुख्यमंत्री बनवा; बीडच्या शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र

शिवसेनेचे 39 आमदार आणि 9 अपक्ष आमदारांसह एकनाथ शिंदे गुवाहाटीत तळ ठोकून आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बीड : एकीकडे राज्यात सत्तांतर होणार की नाही याबद्दलचं चित्रं स्पष्ट होत नसताना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने राज्यपालांना पत्र लिहून एक वेगळीच मागणी केली आहे. यामध्ये त्याने राज्यातील एकूण राजकीय गोंधळ लक्षात घेता आपल्याला राज्याचा काळजीवाहू मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्याच्या या मागणीचं पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. श्रीकांत गदळे (Shrikant Gadale) असे राज्यापालांना पत्र धाडणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. (Beed Farmer Letter To Governor)

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकार सध्या अस्तित्वाच्या संकटाला तोंड देत आहे. शिवसेनेचे 39 आमदार आणि 9 अपक्ष आमदारांसह एकनाथ शिंदे गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे राज्यातील सराकार अल्पमतात येण्याची आणि शिंदेसेना वेगळा मार्ग पत्कारून राजकीय भूकंप घडवण्याच्या वाटेवर आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहेत. त्यात गदळे यांनी राज्यपालांना पत्र लिहून थेट काळजीवाहू मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली आहे. (Maharashtra Politics)

पत्रात नेमकं काय?

केज तहसीलच्या दहिफळ (वडमाऊली) येथील रहिवासी श्रीकांत गदळे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी राज्यातील सर्वसामान्यांच्या समस्यांकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुर्लक्ष झाले असून, शेतकऱ्यांना मदत केली जात नसल्याचा दावा गदळे यांनी पत्रात केला आहे.

मी 10-12 वर्षे राजकारण आणि सामाज कार्यात अग्रेसर आहे. शेतकरी, गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करीत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याठिकाणचा शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. परंतु, सरकारने तात्काळ मदत करणे अपेक्षित होती. परंतु, ती मिळाली नाही.

तरी, आज मुख्यमंत्री यांनी 2.5 वर्षे सत्तेत राहून सर्व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेले आहे. राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सत्तेत राहून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना दिलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू अथवा प्रभारी मुख्यमंत्री म्हणून न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी.

मी जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावेन,बेरोजगारी, आत्महत्या ग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार या सर्वांना न्याय देण्याचे काम करेन. विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण तात्काळ माझी नियुक्ती करावी ही विनंती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT