sakal
मराठवाडा

बीड: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

तीन दिवसीय पदयात्रेनंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

सकाळ वृत्तसेवा

बीड: अतिरिक्त पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयाची आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी वडवणी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. १५ सप्टेंबरपासून या मोर्चाला सुरवात झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला होता.

शेतकऱ्यांवर नेहमीच कोणते ना कोणते संकट कोसळते. यावर्षी खरीप पीक चांगले आले होते. मात्र अतिरिक्त पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. अतिरिक्त पावसामुळे शेतीसह पिकाचे मोठे नुकसान झाल्याने त्याचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्याच्या भानगडीत न पडता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी. यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढण्यात आला.

१५ सप्टेंबर रोजी चिंचोटी (ता. वडवणी) येथून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर तीन दिवसांच्या पदयात्रेनंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिले. जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. जनता दलाच्या राष्ट्रीय सचिव सुशिला मोराळे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

Maratha Reservation: मनोज जरांगेंची तुलना मोहम्मद अली जिनांशी; नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान, EWS आरक्षणावरुन टिपण्णी

Thane News : मर्जिया पठाण यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती

Sakshi Malik: बजरंग, विनेश यांच्यामुळे कुस्ती आंदोलनाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला; साक्षी मलिकची टीका

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघाचेच; सुप्रिया सुळे यांचा दावा

SCROLL FOR NEXT