Crop Damage sakal
मराठवाडा

Beed : नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवणार

विभागीय आयुक्त केंद्रेकरांकडून पिकांची पाहणी : शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

सकाळ वृत्तसेवा

गेवराई : झालेल्या पिकांच्या नुकसानीचा वस्तुस्थितीनुसार अहवाल सरकार दरबारी पाठवला जाईल, असे आश्वासन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतकऱ्यांना दिले. तालुक्यात मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले उत्पन्न वाया गेले असून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी बुधवारी आयुक्त केंद्रेकर यांनी केली.

तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आयुक्त सुनील केंद्रेकर बुधवारी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्यात दाखल झाले होते.

त्यांनी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जो नुकसानग्रस्त भाग दाखवला तो तर पाहिलाच परंतु रस्त्याने जाताना अचानक एका ठिकाणी त्यांनी गाडी थांबविली. थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेले. त्याठिकाणी शेतकरी चिखलामध्ये कापसाची वेचणी करत होते. शेतकऱ्यांनी केंद्रेकरांना पाहताच आपल्या व्यथा मांडायला सुरुवात केली.

तेव्हा केंद्रेकरांनी नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे, हे सांगायची गरज नाही. आपणाला मदत मिळेल. वस्तुस्थितीनुसारचा अहवाल सरकार दरबारी पाठवला जाईल, असे आश्वासीत केले. एकदा पाहणी झाल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या जाणार असल्याचेही आयुक्त केंद्रेकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार लक्ष्मण पवार, तहसीलदार सचिन खाडे, मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळे, कृषी विभागाचे लहू चव्हाण, शेतकरी नेते उद्धव घोडके, नानासाहेब पवार, जे.डी. शहा आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT