Pankaja Munde 
मराठवाडा

Beed : संकटातील शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने मदत द्यावी; पंकजा मुंडे

पंकजा मुंडे; पीक नुकसानीची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

बीड : परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीनसह खरीप पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने नुकसानीचे सरसकट पंचनामे करून लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली.

श्रीमती मुंडे यांनी बुधवारी (ता. १९) तालुक्यातील जाधववाडी शिवारात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते रमेश आडसकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आदी सोबत होते. जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांची अक्षरशः माती झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास ऐन सणात हिरावला आहे.

दरम्यान, पीक नुकसानीची त्यांनी बुधवारी पाहणी केली. तहसीलदार सुहास हजारे यांनी नुकसान व पंचनाम्याबाबत माहिती दिली. पंकजा मुंडे म्हणाल्या, शेतकरी हताश आणि निराश आहे. अशा संकटात त्याला आधार दिला पाहिजे.

नुकसान मोठे आहे, सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी तसेच महामार्गाच्या लगत असलेल्या शेतात निकृष्ट नाली बांधकामामुळे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे.

यात दोषी कंत्राटदारावर कारवाई व्हावी अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली. पीक विम्याच्या बाबतीत जिल्ह्यावर अन्याय होत आहे. पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. विमा कंपनीला सरकारच्या आदेशाचे पालन करावेच लागेल असंही त्या म्हणाल्या.

शेतकऱ्यांना अश्रू अनावर

शेतीतील नुकसानीची माहिती देत असताना भारत जाधव नावाच्या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. आमच्यावर आभाळच कोसळलंय, लई नुसकान झालंय, आता जिवाचं बरं वाईट केल्याशिवाय पर्याय नाही. या संकटातून आम्हाला बाहेर काढा असं म्हणत हा शेतकरी ओक्साबोक्शी रडू लागला. पंकजा मुंडे यांनी या शेतकऱ्याला सावरत सरकार नक्की मदत करेल, मी तुमच्या पाठीशी आहे असा धीर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT