Beed Kelsangvi village woman dragon fruits farming 
मराठवाडा

बीड : कष्ट, नियोजनातून महिलेने फुलविली फळबाग

ड्रॅगन फ्रूटने गवसला शाश्वत उत्पन्नाचा मार्ग, केळसांगवीतील विजया घुले यांची यशोगाथा

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी : आज सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपला ठसा उमटवत आहेत. तालुक्यातील केळसांगवी येथील महिला शेतकरी विजया गंगाधर घुले या त्यातीलच एक. कष्ट व नियोजनातून त्यांनी आपल्या दोन एकर शेतीत ड्रॅगन फ्रूटसह विविध फळझाडांची लागवड केली आहे. त्यातील ड्रॅगन फ्रूटमधून त्यांना उत्पन्न सुरू झाले असून, इतर पिकेही हमखास भरघोस उत्पन्न देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आष्टी शहरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर केळसांगवी हे गाव आहे. येथील महिला शेतकरी विजया गंगाधर घुले यांना चार एकर जमीन असून, त्यातील दोन एकरमध्ये त्यांनी फळझाडे लावली आहेत. त्यांची दोन्ही मुले परगावी नोकरीनिमित्त असतात. गावाकडच्या शेतीची सर्व जबाबदारी त्याच सांभाळतात.

दरम्यान, पुणे येथील कृषी प्रदर्शनात ड्रॅगन फ्रूट फळपिकाबाबतची माहिती मिळाल्यानंतर विजया घुले यांनी कृषी विभागातील तालुक्यातील शिराळ येथील प्रवीण आजबे यांच्या सल्ल्यानुसार या फळपिकाची लागवड केली. एकूण चारपैकी दोन एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली असून, विहिरीचे पाणी या पिकाला दिले जाते. त्यासाठी संपूर्ण दोन एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे. दोन एकरसाठी ड्रॅगन फ्रूट व आंतरपीक म्हणून सफरचंद, पेरू, खजूर लागवडीची मेहनत व मशागत असा ७ लाख रुपयांचा खर्च आला. यापैकी ठिबक सिंचनासाठी कृषी विभागाकडून ५० हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले.

सध्या दोनपैकी अर्धा एकर क्षेत्रावरील ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन सुरू झाले आहे. पहिल्या वर्षातच या पिकावर झालेल्या खर्चाची रक्कम फिटून जाणार आहे. यानंतर प्रतिवर्षी अंदाजे दर जरी कमीअधिक झाला तरी एकरी ५ ते ७ लाखांपर्यंत उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.

कुटुंबीयांची मदत अन् कृषी विभागाचे मार्गदर्शन

विजया घुले यांना बाहेरगावी नोकरी करीत दोन्ही मुले दत्तात्रय व ज्ञानेश्वर यांच्यासह सुना प्रतीक्षा व निशा यांची याकामी मदत होते. त्याचप्रमाणे बीड येथील कृषी अधीक्षक बाळासाहेब जेजुरकर, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, मंडळ अधिकारी रविराज शिदोरे आदींचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

ड्रॅगन फ्रूटची वैशिष्ट्ये...

कमी पाण्यात व हलक्या जमिनीतही चांगले उत्पादन निघते. फवारण्या व इतर खर्च तुलनेत कमी येतो. हंगामात सात ते आठ तोडे होतात. बाजारपेठही सहज उपलब्ध होते. नगर, पुणे, वाशी (मुंबई) व सुरत (गुजरात) येथून व्यापारी फळांची मागणी करतात. त्यामुळे विक्रीचा त्रास न होता फळे शेतातून थेट बाजारपेठेत पाठविता येतात.

दोन एकरांत आठशे झाडे

महिला शेतकरी विजया घुले यांनी ड्रॅगन फ्रूटची दोन एकरात एकूण ८०० रोपे लावली आहेत. यापैकी रेड व्हाइट-५०० रोपे, रेड-२०० रोपे व यलो-१०० रोपे आहेत. पहिल्या तोड्यापासून ३ टनाचे उत्पादन (७० ते ८० हजार रुपये प्रतिटन) होते. वर्षभरात अर्धा एकरात ८ ते ९ टनाच्या आसपास उत्पादन निघून, साधारण ५ लाख रुपयांचे उत्पन्न होण्याचा अंदाज आहे.

आंतरपिकांचा अभिनव प्रयोग

ड्रॅगन फ्रूटमध्ये आंतरपीक म्हणून पेरू तसेच खजूर व सफरचंद ही फळपिके घेण्याचा अभिनव प्रयोग विजया घुले यांनी केला आहे. सर्व चार पिके एकत्रितरीत्या घेतली आहेत. यापैकी हिमाचल प्रदेशमधून सफरचंदाची फर्मन-९९ व आण्णा या दोन जातींची २४० झाडे तसेच वलसाड (गुजरात) येथून वरही (पिवळा) या जातीची खजुराची ८० झाडे आणली आहेत. या आंतरपिकांपासूनही ५ ते १० लाख रुपये एकरी उत्पादन येण्याची खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT