बीड: मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा मोठा प्रसार होत होता. त्यामध्ये बीड जिल्ह्यातही रुग्ण दिवसेंदिवस वाढत होते. सध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण मृत्यूदर वाढत असल्याने धोका कायम आहे. याकाळात कोरोनाची एवढी भीती वाढली आहे की रुग्णांचे नातेवाईकही रुग्णांच्या जवळ जात नाहीत. अशात जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील विजयसिंह बांगर यांचे काम कौतुकास्पद ठरत आहे.
झालं असं की, नाळवंडीतील (जि.बीड) संपूर्ण गुजर कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली होती. घरातील सर्व सदस्य कोविड इलाजासाठी दवाखान्यात असताना घरी आजी एकट्याच होत्या. त्या २ दिवसांपासून अन्नपाण्याविना गोठ्यात पडून असल्याने त्यांच्याजवळही कोणी जात नव्हते. ही माहिती मिळताच विजयसिंह बांगर यांनी त्याठिकाणी जात आजींना रुग्णालयात नेले. आजींचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना न्युमोनियाचे निदान झाले असून त्यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एका वर्षापासून काम सुरू-
बांगर हे गेल्या एक वर्षापासून रुग्णांची अशी सेवा करत आहेत. ज्यांना रुग्णालयात जायला वाहन उपलब्ध नसेल त्यांना ते मदत करत आहेत. बांगर हे पाटोदा तालुक्यात मागील एका वर्षापासून चार गाड्याद्वारे रुग्णांना सेवा देत आहेत. आतापर्यंत त्यांनी एक हजार पेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोचवण्याची सेवा दिली आहे. तसेच बांगर यांनी ५०० पेक्षा जास्त लोकांनी HRCT टेस्ट करण्यासाठी आर्थिक मदतही केली आहे.
सध्या बरेच जण कोरोनाकाळात मदत करताना दिसत आहेत. पण स्वतः रुग्णांची सेवा करत त्यांना आर्थिक मदत करण्याचेही कौतुकास्पद काम विजयसिंह बांगर करत असल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. बांगर यांनी ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येत समाजासाठी काम करण्याचे आवाहनही बांगर यांनी केले.
"कोरोनाकाळात लोकं काही लोकं माणुसकी विसरले आहेत. आज आपण सर्वजण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे."
- विजयसिंह बांगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.