Kunbi Certificate esakal
मराठवाडा

Kunbi Certificate : कुणबी प्रमाणपत्रे वाटपात बीडची आघाडी; आत्तापर्यंत दिली ८२ हजार प्रमाणपत्रे

मराठा - कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी जात अशा जुन्या दस्तऐवजांच्या शोधात सापडलेल्या नोंदींचे वारसांना प्रमाणपत्रांच्या वाटपात बीड जिल्हा महसूल प्रशासनाने आघाडी घेतली आहे.

दत्ता देशमुख

बीड - मराठा - कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी जात अशा जुन्या दस्तऐवजांच्या शोधात सापडलेल्या नोंदींचे वारसांना प्रमाणपत्रांच्या वाटपात बीड जिल्हा महसूल प्रशासनाने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात तब्बल ८२ हजार ५४५ मराठा - कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, परळी तालुक्यात केवळ ३८८ प्रमाणपत्रांचेच वाटप करण्यात आले आहे. कुणबी नोंदी आढळण्यातही परळी तालुका पिछाडीवरच आहे.

मराठवाडा विभागात बीड जिल्हा कुणबी नोंदी सापडण्यात आघाडीवर असलेल्या बीड जिल्ह्याने मराठा - कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र वाटपात राज्यात आघाडी घेतली आहे. मराठा समाजाला सरकसट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषण सुरु केल्यानंतर शासनाने मराठा - कुणबी, कुणबी - मराठा व कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली.

निजामकालीन दस्तऐवजांसह जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर (गाव नमुना १४), खासरा पत्रक, पाहणी पत्रक, जनगणना रजिस्टर, गाव नमुना क्रमांक सहा, प्रवेश निर्गम रजिस्टर, हक्क नोंदवही या १९१३ ते १९६७ पर्यंतच्या कागदपत्रांमध्ये मराठा - कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यात आल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कारागृह अधीक्षक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पोलिस उपअधीक्षक (गृह), अधीक्षक उत्पादन शुल्क या अधिकाऱ्यांच्या समित्यांकडून जिल्ह्यात २७ लाख पाच हजार २१० दस्तावेजांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २१ हजार ९०७ कुणबी नोंदी आढळल्या .

दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमणापत्र व आरक्षण देण्याच्या मागणीचा मुद्दा कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ८२ हजार ५४५ मराठा - कुणबी, कुणबी - मराठा, कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत हे जात प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. महा ई सेवा केंद्रांवरुन देखील सदर प्रमाणपत्र वाटप केले जाते.

परळी तालुका प्रमाणपत्रांत पिछाडीवर

जिल्ह्यात २१ हजार ९०७ कुणबी नोंदी आढळल्या ओहत. सर्वाधिक ५१९९ नोंदी आष्टी तालुक्यात आढळल्या आहेत. तर, बीड ३०६१, गेवराई ४३७५, शिरुर ३५२, पाटोदा ९०६, माजलगाव २२००, धारुर ८१७, वडवणी १०३२, अंबाजोगाई ७१६, केज २६३०, परळी ६१९ नोंदी आढळल्या आहेत. सर्वात कमी नोंदी आढळलेल्या शिरुर कासार तालुक्यात ४१३२ कुणबी, कुणबी - मराठा, मराठा कुणबी-जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

तर, ९०६ कुणबी नोंदी आढळलेल्या पाटोदा तालुक्यात देखील ९०८५ कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबी-जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. अंबाजोगाई तालुक्यात देखील कुणबी नोंदींची संख्या ७१६ असली तरी या तालुक्यातून ५०५४ कुणबी प्रमाणपत्र वाटप केले. धारुर तालुक्यातील ८१७ नोंदींच्या आधारे कुणबी, तर परळी तालुक्यात ६१९ नोंदी आहेत. मात्र, जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ३८८ कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र परळी तालुक्यात वाटप केले आहे.

बीड तालुक्यात सर्वाधिक कुणबी

कुणबी, कुणबी - मराठा, मराठा कुणबी - जात प्रमाणपत्र वाटपात बीड तालुका आघाडीवर असून या तालुक्यातून १५३१८ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. बीड तालुक्यात एकही अर्ज नामंजूर नसल्याची माहिती, उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी दिली. बीडनंतर गेवराईतून १३१७३, आष्टी तालुक्यातून १३ हजार १५४, केज ११३००, शिरुर कासार तालुक्यात ४१३८, पाटोदा तालुक्यात ९०८५, माजलगाव ५३३७, धारुर २६४६, वडवणी २९६१, अंबाजोगाई ५०४५ प्रमाणपत्रांचे वितरण झाले आहे.

महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या महत्त्वाच्या कामातही कुणबी, कुणबी - मराठा, मराठा कुणबी - जात प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेत धडाडीने काम केले आहे. कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपात बीड प्रशासन अव्वल आहे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कचे हे यश आहे.

- दीपा मुधोळ- मुंडे , जिल्हाधिकारी, बीड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT