beed maratha reservation protest stone pelting in beed loss of 20 crores Solanke - Kshirsagar are most affected Esakal
मराठवाडा

Beed Maratha Reservation : जाळपोळ - दगडफेकीत बीड जिल्ह्यात नुकसान २० काेटींच्या घरात; सर्वाधिक फटका सोळंके - क्षीरसागरांना

आरक्षण मागणीसाठी जिल्ह्यात गेल्या बुधवार पासून साखळी उपोषणे सुरु

दत्ता देशमुख

बीड : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ अगोदर उत्स्फुर्त साखळी उपोषणानंतर अगोदर बसची जाळपोळ व तोडफोडीनंतर सोमवारी (ता. ३०) आंदोलनाने उग्र रुप धारण केले.

नेत्यांची घरे, कार्यालये, हॉटेल्स, दुकानांची जाळपोळ आणि तोडफोडीत जिल्ह्यात साधारण २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सर्वाधिक फटका आमदार ्रपकाश सोळंके व क्षीरसागरांना बसला आहे.

आरक्षण मागणीसाठी जिल्ह्यात गेल्या बुधवार (ता. २५) पासून सर्कलनिहाय साखळी उपोषणे सुरु आहेत. यात काही ठिकाणी कॅंडल मार्च, ठिय्या, भजन - किर्तन अशा स्वरुपाची आंदोलने होत होती. दरम्यान, शनिवारी (ता. २८) रात्री अचानक धुळे - सोलापूर राष््रटीय महामार्गावर चक्काजाम करुन टायर जाळण्यात आले.

यानंतर बीड - कोल्हापूर ही बस पेटविण्यात आली. यामुळे परिवहन महामंडळाने बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तरीही दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. २९) दोन बसवर दगडफेक करण्यात आली.

सोमवारी (ता. ३०) सकाळी जिल्ह्याात नियमित आंदोलने सुरु असतानाच माजलगावला कथित ऑडीओ क्लिपवरुन आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याला हजारों आंदोलकांनी घेराओ घातला आणि दगडफेक केली. समोरील दोन चार चाकी व चार दुचाकी जाळण्यात आल्या. बंगल्यातील सर्व खोल्यांतील सर्व टिव्ही संच, खाटा, सर्व काचा फोडल्या.

यात तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आंदोलकांनी त्यांचे बंधू धैर्यशिल सोळंके यांच्या बीडमधील उत्तम नगर भागातील बंगल्यासमोरील दुचाकींनाही आग लावली. यात तीन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तर, फाटक आणि बंगल्याच्या काचांचेही मोठे नुकसान झाले आहे.

सर्वाधिक नुकसान बीडमधील क्षीरसागरांच्या बंगल्याचे झाले आहे. बंगल्यासमोरील तब्बल सात चारचाकी व चार दुचाकी वाहने जळून खाक झाली आहेत. यात अद्यायवत अलिशान कारही जळून खाक झाल्या आहेत. यासह बंगल्यातील काही फर्निचर, वॉटर फिल्टर, इन्व्हर्टर आदी विद्युत उपकरणेही जळून खाक झाली आहे. याचे नुकसानही तीन कोटींच्या पुढे असण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे चार दिवसांपासून बस बंद असल्याने दोन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहेच. शिवाय, महामंडळाची एक बस जाळल्याने तसेच सोमवारी रात्री ५७ आणि यापूर्वी दोन अशा ५९ बस फोडल्याने तब्बल सव्वा कोटी रुपयांचे हे अधिकचे नुकसान झाले आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सोनाजीराव होमिओपॅथीक महाविद्यालयातील कार्यालय पेटवून देण्यात आले. यातही फर्निचर तसेच इतर साहित्य असे पाच लाखांवर नुकसानीचा अंदाज आहे.

समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांचे जालना रोडवरील सनराईज हॉटेलला समोरच्या भागातील आगीत दोनेक लाखांहून अधिक नुकसानीचा अंदाज आहे. तर, बार्शी रोडवरील राष्ट्रवादी (शरद पवार गट) भवनाला लागलेल्या आगीत संगणक, फर्निचर, खुर्च्या असे १० लाखांवर नुकसान झाले आहे.

सुभाष रोडवरील मंगेश लोळगे यांच्या दुकानावरील दगडफेक व समोरील दोन दुचाकी जाळल्याने तीनेक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आंदोलकांनी सायंकाळी शिवसेना जिल्हा ्रपमुख कुंडलिक खांडे यांचे नगर नाका भागातील कार्यालयावर दगडफेक केली होती. रात्री उशिरा कार्यालयाला आग लावण्यात आली. यात संगणक, फर्निचर, खुर्च्या जळून दहा लाखांच्या नुकसानीचा अंदाज आहे.

शिवसेनेचे जिल्हा ्रपमुख सचिन मुळूक यांच्या कार्यालयांवर दगडफेक झाली. याच बाजूच्या स्वराज हॉटेलचीही मोठी तोडफाेड करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कार्यालयाचेही मोठे नुकसान करण्यात आले. यात चार लाख रुपयांहून अधिक नुकसानीचा अंदाज आहे.

शहरातील रिलायन्स ट्रेंड्स व एका दुचाकी शोरुमचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच, माजलगावधील पंचायत समिती, नगर पालिका, आष्टीत तहसिलदारांचे शासकीय वाहन, बीडमधील बीआरएसचे दीलीप गाेरेे यांचे कार्यालय, बीडची नगर पालिका यांच्या तोडफोड आणि जाळपोळीत मोठे नुकसान झाले. आंदोलकांनी रस्त्यांवरील बॅनरही फाडून जाळले. विशेष म्हणजे आग विझविण्यासाठी जाणारे अग्नीशमन वाहनही जाळण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT