manoj jarange helicopter esakal
मराठवाडा

Manoj Jarange patil : जरांगेंची नारायणगडावर होणार हेलिकॉप्टरने एंट्री; मेळावा अठरापगड जातींचा

सकाळ वृत्तसेवा

Narayangad dasara melava: परंपरागत दसरा मेळाव्याची परंपरा श्रीक्षेत्र नारायण गडावर पुन्हा जोमाने सुरू होत आहे. मेळाव्यात कोणतेही राजकारण नाही वा हा मेळावा कुठल्याही एका जातीचा नसून बहुजन समाजातील अठरापगड जातींचा हा मेळावा असल्याचे मत मराठा आरक्षण आंदोलककर्ते मनोज जरांगे यांनी केले.

श्रीक्षेत्र नारायणगडावर शनिवारी (ता. १२) होणाऱ्या दसरा मेळावा तयारीच्या अनुषंगाने रविवारी (ता. सहा) जरांगे गडावर आले. यावेळी नियोजित सभास्थळावरील व्यासपीठाचे भूमिपूजन शिवाजी महाराज यांच्या हस्ते झाले. जरांगे म्हणाले, कोणीही घरी थांबू नका, सोशल मीडियावर सक्रिय व्हा, बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या माता-भगिनींची गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. मेळाव्याला गालबोट लागता कामा नये.

सेवकांकडून हेलिकॉप्टर

मेळाव्याला राज्यभरातून गर्दी होणार आहे. गडांवरील रस्ते पाहता जरांगे यांना पोचण्यास उशीर होऊ नये यासाठी मराठा सेवकांनी मनोज जरांगे यांना येण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. हेलिकॉप्टर स्वीकारण्याची विनंती यावेळी सेवकांनी केली. जरांगे व शिवाजी महाराज यांनी ही विनंती मान्य केली. दोघे हेलिकॉप्टरमधून गडावर येतील, असे यावेळी सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: मलिदा गँग, बारामती अन् इंदापूर... हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळी शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

Latest Maharashtra News Updates : अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात निवडणूकांबाबत चर्चा

Stock Market Crash: पंतप्रधान मोदींनी ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा दिला होता सल्ला तेच शेअर्स कोसळले

मारुती सुझुकी आणि टोयोटा एकसारख्याच गाड्या वेगळ्या नावाने का विकतात? या सणासुदीला नवीन कार घेण्याआधी ही बातमी नक्की वाचा..

SCROLL FOR NEXT