beed dpdc  sakal
मराठवाडा

Beed News : डीपीसीच्या बैठकीत निधी वाटपाचे अधिकार पालकमंत्र्यांंना; प्रगतिशील जिल्हा बनवावा मुंडे

धनंजय मुंडे म्हणाले की, यंदा ऊस तोडीचा हंगाम कमी कालावधीचा राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

बीड - जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाचे अधिकार सभागृहाने पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिले. श्री. मुंडे यांनीही समन्यायी वाटप करण्याची ग्वाही सभागृहाला दिली. जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करून हा जिल्हा आत्महत्या मुक्त झाला पाहिजे, यासाठी जिल्ह्यातील शासन प्रशासनासह जनतेनेही एकदिलाने काम करावे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत शक्य त्या लाभासाठी सर्वांनी पोहोचावे व जिल्हा प्रगतिशील जिल्हा बनवावा, असे आवाहन पालकमंत्री मुंडे यांनी केले.जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी (ता.१६) पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार रजनी पाटील, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार विक्रम काळे, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार नमिता मुंदडा, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर उपस्थित होते.

धनंजय मुंडे म्हणाले की, यंदा ऊस तोडीचा हंगाम कमी कालावधीचा राहणार आहे. हे लक्षात घेऊन परत येणाऱ्या ऊसतोड कामगारांसाठी ग्रामसेवक व इतर यंत्रणाच्या त्वरित बैठका घेऊन आगामी कालावधीत त्यांना मनरेगा अंतर्गत रोजगार मिळेल, याबाबत नियोजन करा. योजनांवर लक्ष ठेवून प्रत्येक योजना त्याच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल या दृष्टीने काम करण्याची सूचना त्यांनी दिली.

पारंपारिक शेती न करता शेती हा व्यवसाय म्हणून कामे करणारी आजची पिढी आहे. या पिढीला यांत्रिकीकरण, प्रयोगशील शेती यात माझा विभाग मदत करत आहे. तसेच बांबू लागवडीसाठी देखील जिल्ह्याची निवड झाली आहे. यात हेक्‍टरी सात लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतील, या सर्व प्रयत्नातून मागास आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा, अशी ओळख बदलून विकसनशील बीड अशी नवी ओळख निर्माण करा.

पीक विमा अग्रीमची रक्कम दिवाळीपूर्वी भेटेल, असेही श्री. मुंडे यांनी सांगितले. टॅंकर व विहीर अधिग्रहणाचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले. जलजीवनच्या चुकीच्या कामांचे फेरसर्वेक्षण करण्याचे निर्देशही श्री. मुंडे यांनी दिले.

पालकमंत्र्यांचा बैठकांचा धडाका; दोन्ही खासदारांची उपस्थिती

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठकाचा सिलसिला पार पडला. जिल्हा नियोजनसह जिल्ह्यातील पर्यटन, कृषी पर्यटन, आपत्ती व्यवस्थापन, कौशल्य विकास, खनिज परिषद, शिक्षण यासह विविध महत्वाच्या विषयांचा श्री. मुंडे यांनी आढावा घेतला. सहा तास विविध बैठका चालल्या. सर्व बैठकांना खासदार रजनी पाटील व खासदार डॉ.प्रीतम मुंडे शेवटपर्यंत उपस्थित होत्या.

अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असतानाच एकाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला. हनुमान यादवराव जाधव (वय ५५ रा. वासनवाडी, ता. बीड) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या जमिनीबाबतचे प्रकरणावर सध्या महसूल अधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे. दुपारी तीन वाजता अपर जिल्हाधिकारी यांचे कार्यालयासमोर ही घटना घडली. पोलिस निरीक्षक केतन राठोड व अभिजित सानप यांनी तत्काळ हनुमान यादव यांना ताब्यात घेत त्यांच्या हातातील काड्याची पेटी हिसकावून घेतल्याने पुढील घटना टळली. त्यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

करुणा मुंडे आल्या अन् गोंधळ उडाला

जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना करुणा मुंडे आल्या. त्यांना खाली आणून कारमध्ये बसविताना उभा असलेल्या एकास धक्का लागल्याने गोंधळ उडाला. पालकमंत्र्यांचे सुरक्षारक्षक श्री. चाटे यांच्याकडून धस समर्थक माऊली जरांगे यांना बाजूला जोराने ढकलल्याने गोंधळ उडाला. या प्रकारानंतर संबंधिताने दिलगिरी व्यक्त केली. मात्र, फक्त मुंडे समर्थकांनीच यावे, असा फलक लावा असे माऊली जरांगे म्हणाले. करुणा मुंडे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या. बैठक सुरू असलेल्या सभागृहात त्या गेल्या. मात्र, येथे इतरांना बसण्याची परवानगी नसल्याचे सांगून त्यांना खाली आणले. यावेळी त्यांना कारमध्ये बसविताना हा प्रकार घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT