Jaydutt Kshirsagar  esakal
मराठवाडा

Jaydutt Kshirsagar : बीडच्या काका-पुतण्याचा वाद मिटला? जयदत्त क्षीरसागरांच्या मंचावर आमदार संदीप क्षीरसागरांच्या वडिलांची उपस्थिती

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला. या लढतीमध्ये संदीप यांना 99 हजार 934 तर जयदत्त क्षीरसागर यांना 97 हजार 950 मते मिळाली. साधारण दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले.

संतोष कानडे

Beed Sandeep Kshirsagar : बीडमध्ये काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वैर संपुष्टात येणार का? असा प्रश्न उस्थित होत आहे. कारण रविवारी जयदत्त क्षीरसागर यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

बीडमध्ये २०१६पासून काका-पुतण्यामधील बेबनाव दिसून येत होता. तेव्हा झालेल्या नगर पालिका निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीशी दुरावा करीत काकू-नाना विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना नगर परिषद निवडणुकीत उमेदवाऱ्या दिल्या. या निवडणुकीत आपले १९-२० उमेदवार निवडूनही आणले.

पुढे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला. या लढतीमध्ये संदीप यांना 99 हजार 934 तर जयदत्त क्षीरसागर यांना 97 हजार 950 मते मिळाली. साधारण दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले. जयदत्त क्षीरसागर यांचं घर फुटलं असलं तरी त्यांचे दुसरे लहान बंधू आणि जे मागील ३० वर्षांपासून बीड नगर पालिकेत नगराध्यक्ष आहेत; ते भारतभूषण क्षीरसागर त्यांच्यासोबत होते. तुलनेने संदीप क्षीरसागरांनी एकाकी झुंज दिली. आता पुन्हा एकदा राजकीय परिस्थिती बदलत आहे.

२०१९मध्ये शिवसेनेत गेलेल क्षीरसागर तिथे फार रमले नाहीत. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मागच्या दोन वर्षांपासून क्षीरसागर राजकीय विजनवासात होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बजरंग सोनवणे यांना मदत केल्याची चर्चा झाली होती. शिवाय निवडून आल्यानंतर सोनवणे यांनी क्षीरसागरांची भेटही घेतली.

बीडमध्ये आता पुन्हा राजकीय समीकरण बदलत आहे. विरोधात असलेला पुतण्या पुन्हा काकांसोबत येणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचं कारण आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली आहे. त्यामुळे क्षीरसागर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतात का? हे पाहाणं महत्त्वाचं आहे. याशिवाय वेगळं काहीतरी समीकरण बीडमध्ये दिसेल का? हेदेखील मेळाव्यानंतर किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये कळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT