Sharad Pawar sabha in beed 
मराठवाडा

सभा शरद पवारांची, चर्चा अजित पवारांच्या बॅनरची, राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? कार्यकर्ते संभ्रमात...

Sandip Kapde

Beed Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आज (गुरुवार) बीडमध्ये सभेला संबोधित करणार आहेत. याआधी त्यांनी अजित पवार गटाला त्यांच्या छायाचित्रांच्या वापरावरून इशारा दिला आहे. अजित गटाने त्यांच्या बॅनर आणि होर्डिंग्जवरून त्यांचे चित्र लावणे थांबवले नाही तर न्यायालयात जाईन, असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.

बीड धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला आहे. मुंडे आता अजित पवार गटात आहेत. त्यामुळे बीडमधील अनेक नेते अजित पवारांसोबत आहेत.

मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या सभेआधी बीडमध्ये बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. बीड मध्ये अजित पवार यांचे बॅनर लागले आहे.  कामाच्या माणसाला आशिर्वाद द्या, असे बॅनवर म्हटलं आहे. या बॅनरवर शरद पवार यांचा देखील फोटो आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा गोंधळ होत आहे. राष्ट्रवादीची नेमकी भूमिका स्पष्ट नसल्यामुळे कार्यकर्ते देखील तळ्यात-मळ्यात आहेत.

दरम्यान सभेपूर्वी शरद पवार यांनी देशभरातील मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला. त्यांच्यावर सामाजिक सौहार्द बिघडवल्याचा आरोप करून ते म्हणाले की मणिपूर हिंसाचारापेक्षा पंतप्रधानांना 2024 मध्ये सत्तेत परतण्याची जास्त चिंता होती. ते म्हणाले, मणिपूर गेल्या 90 दिवसांपासून जातीय हिंसाचारात जळत आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह वापरल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने शरद पवार आणि अजित पवार यांना उत्तर दाखल करण्यासाठी आणखी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. दोन्ही गटांना आज म्हणजेच 17 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करायचे होते. (latest marathi news)

मात्र, उत्तर दाखल करण्यासाठी शरद पवार गटाकडून चार आठवड्यांचा अवधी मागितला होता. यानंतर आयोगाने 8 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात अजित पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे काही कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT