मराठवाडा

Beed Success Story: शेतकऱ्याची पोरगी झाली फौजदार, गावकऱ्यांनी मिरवणूक काढत जेसीबीने केली फुलांची उधळण

प्रविण फुटके

Parali Vaijyanath | तालुक्यातील लिंबोटा येथील अल्पभूधारक शेतकरी दत्तू दादाराव कराड यांची मुलगी अत्यंत कठीण परिस्थितीतून मेहनत, आत्मविश्वासाच्या बळावर फौजदार झाली असून पहिल्यांदा घरी आल्यावर तिचे फुलांची उधळण व विद्युत रोषणाई करत भव्य स्वागत करण्यात आले. आई- वडीलांच्या कष्टाचे चिज झाल्याने अश्रू अनावर आले.

लिंबोटा येथील अल्पभूधारक शेतकरी दत्तू दादाराव कराड व सुवर्णमाला यांना दो मुले व दोन मुली यांचे शिक्षण पूर्ण करणे म्हणजे तारेवरची कसरत पण आपण स्वतः दत्तू कराड व पत्नी सुवर्णमाला निरक्षर असल्याने आपल्या मुलांनी शिक्षण घेवून स्वतः च्या पायावर स्वाभिमानाने उभे राहावे ही मनोमन इच्छा होती. यामुळे अधिकचे कष्ट करून चारही मुलांचे शिक्षण पूर्ण झाले पाहिजे हा अट्टाहास होता.

विशेषतः मुलीने तर उच्च शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. राणी कराड हीचे दहावी व ११ वी १२ वीचे शिक्षण गावातच असलेल्या संत भगवानबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक मध्ये पूर्ण केले. दहावीला चांगले मार्क्स पडल्याने सर्वांनी सांगितले की, तु सायन्स घे, कला शाखेत मध्ये काही नसते पण लहानपणापासून आपण सरकारी नोकरी मध्ये अधिकारी झाले पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून राणीने ११ वीला कला शाखेत (आर्ट्स) प्रवेश घेतला. यानंतर लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बीएची पदवी घेत असताना स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली. २०१७ पासून सलग सहावेळा प्रिलेम परिक्षा पास झाली पण मुख्य परिक्षेचा अडथळा दूर होत नव्हता. पण काही झाले तरी हार मानायची नाही, असे ठरवले असल्याने अभ्यासात सातत्य ठेवले.

स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असतानाच इतर परिक्षाही देण्यास सुरुवात केली यामध्ये २०२४ मध्ये पुणे जिल्हा तलाठी परिक्षेसाठी जाहिरात निघाली व या परिक्षेत यश मिळाले. तलाठी म्हणून जाँईनींग घेतली. याच कालावधीत २०२२ मध्ये स्पर्धा परिक्षेतंर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परिक्षा झाली यामध्ये प्रि व मेन परिक्षेत यश मिळाले. यानंतर ग्राऊंड व सलेक्शन झाले. राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पीएसआय परिक्षेत आँगस्ट मध्ये लागलेल्या निकालात एनटी डी महिला प्रवर्गातून राज्यात पहिल्या क्रमांकाने पास होत फौजदार झाली.

परिक्षेचा निकाल लागल्यानंतर एका अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलगी फौजदार झाल्याने गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याने दोन दिवसांपूर्वी गावात आल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूक काढून जिसीबींच्या मदतीने फुले टाकून,गुलाल उधळून स्वागत करण्यात आले.

तसेच घरी भावांनी मोठ्या उत्साहात रांगोळी, फुलांची सजावट, विद्युत रोषणाई करत फौजदार लेकीचे, बहिणीचे भव्य स्वागत केले. यावेळी आई,वडीलांना आपली लेक फौजदार झाल्याने, लेकीने आपली मान ताट केली व भावांकडून झालेले स्वागत पाहून अश्रूंचा बांध फुटला होता.

दत्तू दादाराव कराड, सुवर्णमाला कराड अशिक्षित असताना चारही मुले उच्च शिक्षीत.....

लिंबूटा येथील अल्पभूधारक शेतकरी दत्तू कराड यांना चार अपत्य असून मोठा मुलगा जनार्धन कराड याचे शिक्षण डी फार्मसी, वर्षा कराड डीएम एलटी, राणी कराड पोलीस उपनिरीक्षक आणि योगेश कराड एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी (कडा प्राथमिक आरोग्य केंद्र) वेळप्रसंगी आई,वडीलांनी स्वतः शेतीवर प्रपंच चालवणे कठीण झाल्याने इतर ठिकाणी मजूरी करुन चारही अपत्यांना प्रामणिकपणे शिक्षण दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) फुलचंद कराड यांच्या वतीने सत्कार

लिंबोटा गावची कन्या राणी दत्तू कराड हिने गावातून पहिली महिला फौजदार होण्याचा मान मिळवल्याने व व्ही जे एन टी मध्ये महाराष्ट्रात पहिली आल्याबदल संत भगवान बाबा विद्यालयाचे अध्यक्ष फुलचंद कराड व नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Thane: मविआला संधी मिळाल्यास सर्वात आधी शिंदेंवर राग काढणार अन्...; मोदींचा ठाण्यातून घणाघात

Sitaram Dalvi Passed Away: बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ सहकाऱ्याचं निधन! राज ठाकरेंनी केली पोस्ट

IND vs BAN 1st T2OI : संजू सॅमसन ओपनिंगला, मयांक किंवा हर्षित यांचे पदार्पण? पहिल्या सामन्यासाठी भारताची संभाव्य Playing XI

Phullwanti : "त्यावेळी स्मिता तळवलकर यांच्या रूममध्ये झोपायचे" ; दिग्दर्शिका झालेल्या स्नेहल तरडे यांचा डोळ्यात पाणी आणणारा प्रवास

Latest Marathi News Live Updates: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ केलेले पाच पोलिस पुन्हा सेवेत

SCROLL FOR NEXT