मराठवाडा

Beed Success Story: अथक परिश्रम करुन ऊसतोड मजुराचा मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक

सकाळ वृत्तसेवा

Parali Vaijyanath| साखर कारखान्यासाठी ऊसतोडणी व शेतमजुरी करत जीवन जगणाऱ्या अंबलवाडी येथील रंभाजी गर्जे यांचा मुलगा नितीन याने अथक परिश्रमाने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. नुकत्याच जाहीर झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परिक्षेत नितीन याची निवड झाली असुन तो प्रशिक्षणासाठी नाशिक येथे रवाना झाला आहे.नितीन याची निवड होताच अंबलवाडी ग्रामस्थांनी पेढेतुला करत गावातुन मिरवणुक काढली.

परळी- अंबाजोगाई महामार्गाच्या बाजुला डोंगरदऱ्यामध्ये वसलेले अंबलवाडी या गावातील ऊसतोड कामगार रंभाजी गर्जे व अनुसया गर्जे यांचा मुलगा नितीन याने २०२२ मध्ये पीएसआयची परिक्षा दिली होती.या परिक्षेचा नुकताच निकाल लागला.यात नितीन उत्तीर्ण झाला असुन तो प्रशिक्षणासाठी नाशिक येथे रवाना झाला आहे.

त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नंदागौळ या ठिकाणी शिक्षण पूर्ण केले त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण पाटोदा येथे पूर्ण केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घेण्यात आलेल्या २०२२ च्या पीएसआय परीक्षेमध्ये १०३ रँक ने यश संपादन केले.नितीन गर्जे याची निवड होताच अंबलवाडी गावात ग्रामस्थांनी त्याची पेढेतुला करत मिरवणुक काढुन सत्कार केला.

निवडीबद्दल नितीन याचा सत्कार

नितीन गर्जे याची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यानंतर अंबलवाडी गावात मुकादम बालाजी केंद्रे यांनी त्याची पेढेतुला केली तर परळी येथे सुरेश गर्जे,चंद्रकांत गर्जे, शरद घनचक्कर,उमेश गर्जे,शिवम गर्जे,जगन्नाथ दहिवाडे,बाळु गर्जे,अश्विन मोगरकर,प्रकाश चव्हाण आदींनी सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT