beed 11.jpg 
मराठवाडा

बीड : शिक्षण विभागाचा अनोखा पॅटर्न, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्ही स्कूल प्रणाली 

सकाळवृत्तसेवा

बीड : कोवीड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळा सुरू होण्यास अवधी लागत आहे. त्यामुळे इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य, ई-लर्निंग उपलब्ध करून देण्यासाठी व्हीओपीए (VOPA)  या पुणे येथील सामाजिक संस्थेच्या सहकार्याने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी online शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून http://ssc.vopa.in  या संकेतस्थळाचे आज शनिवारी ता.१३ जिल्हाधिकारी राहुल रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. 

जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग व व्हीओपीए (VOPA) सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी  Vschool या http://ssc.vopa.in संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. उद्घाटन प्रसंगी शिक्षण विभागातील अधिकारी, तज्ञ मार्गदर्शक शिक्षक व व्होवेल्स आॅफ पीपल्स असोसिएशन (Vowels of the People  Association) चे सदस्य उपस्थित होते.

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
बीड जिल्ह्यातील इ. १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, बीड व VOPA Team सामाजिक संस्था ,पुणे यांचे मार्फत जिल्ह्यातील नामवंत शिक्षकांद्वारे शैक्षणिक साहित्य निर्माण केलेले आहे. याबरोबरच प्रत्येक पाठासाठी डिजिटल माध्यमावरती उपलब्ध असणारे सर्वोत्तम साहित्य, व्हिडिओ, चित्रे ,स्वमूल्यांकन व चर्चेद्वारे शिक्षण अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

VOPA Team यांनी शिक्षकांच्या साह्याने विद्यार्थ्यांना वापरण्यास सोपे व अतिशय उपयुक्त असे साहित्य http://ssc.vopa.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले आहे. बीड जिल्ह्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी विनामूल्य हा शैक्षणिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.  जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी त्याचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साध्य करावी असे आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: 4 लाख कोटींचे नुकसान... ट्रम्प यांच्या विजयाचा जल्लोष ओसरला; सेन्सेक्स 900हून अधिक अंकांनी कोसळला

Ratnagiri Election : निष्ठावंत शिवसैनिकाने घेतली माघार; ठाकरे गटाला मिळाली मोठी ताकद, मुस्लिम बांधवही देणार साथ!

Article 370 मागे घेण्यावरून विधानसभेत राडा, आधी बाचाबाची नंतर आमदारांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

नातेवाईक ६ नंबर म्हणायचे... प्रणित हाटेने सांगितला बालपणीचा कटू अनुभव; काकाने साडी नेसताना पकडलं आणि

Gold Price: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे सोन्याचे भाव कोसळणार; किती घसरण होणार?

SCROLL FOR NEXT