Latest Beed News: जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले आहे. एकूण वार्षिक पर्जन्यमाना पैकी आत्ता पर्यन्त ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे परंतु जिल्ह्यातील १४३ लहान-मोठ्या धरणांमध्ये १५ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर १४ लघू तर ४ मध्यम प्रकल्प भरले आहेत.
बीड जिल्ह्यात मेअखेरपासून अवकाळी पाऊस झाला तर जून व जुलै महिन्यांत रिमझिम पाऊस झाला. आष्टी, पाटोदा भागांत चांगला पाऊस झाल्यामुळे त्या भागातील काही नद्या भरभरून वाहिल्या. दरम्यान, धरणक्षेत्रामध्ये पाऊस झाल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला आहे. धरणातील पाणीपातळी वाढू लागली.
परिसरातील विहीर, बोअरलासुद्धा पाणी असल्याचे ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला धरणांमध्ये केवळ ४ टक्केच पाणीसाठा होता; तो आता १४.४५ टक्के झाला आहे. १४ लघू तर ४ मध्य प्रकल्प भरले आहेत. रिमझिम पाऊस होत असला तरी पाणीपातळी वाढून प्रकल्प भरण्यास सुरुवात झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. पुढील कालावधीत मोठे पाऊस होऊन सर्व परिस्थिती बदलून जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यातील १४३ लहान मोठ्या प्रकल्पनपैकी १८ घरणे १०० टक्के भरली आहेत. त्यातील १४ लघु तर ४ प्रकल्प मध्यम आहेत. तुडुंब भरलेल्या लघुप्रकल्पात घाटनांदूर साठवण तलाव, भायाळा साठवण तलाव, वांगी, काळवटी साठवण तलाव, कातकरवाडी, खोडवा सावरगाव तलाव भरले आहेत.मुंगेवाडी, कन्हेरवाडी, मोरणलवाडी, पिंपळवंडी खोपटी, जळगाव साठवण तलाव, साकूड साठवण तलाव, दैठणा साठवण तलाव, बेदरवाडी साठवण तलाव यांचा समावेश आहे.
महासांगवी मध्यम प्रकल्प, कडा मध्यम प्रकल्प, वाण मध्यम प्रकल्प, बोधेगाव मध्यम प्रकल्प भरले आहे. वास्तविक बीड जिल्ह्यात परतीचा पाऊस अधिक असल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात मोठा पाऊस होऊन जलसाठे तुडुंब भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जिल्ह्याची वार्षिक पर्जन्य सरासरी टक्केवारी ५६६ मिमी एवढी आहे. रविवार (ता.११) रोजीपर्यंत ४२७ .७ मि.मी. पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी ७५.६ एवढी आहे. पावसाची टक्केवारी अधिक आहे; परंतु पाणीसाठा कमी असल्याचे दिसून येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.