beed sakal
मराठवाडा

बीडला आता पाच दिवसांआड पाणीपुरवठा

पंधरवड्याच्या पाणीपुरवठ्यामुळे बीडकर होते त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

बीड : अमृत अटल योजनेचे काम जवळपास पूर्ण होत आल्याने शहरातील नागरिकांना आता पाणी पुरवठ्याबाबत दिलासा मिळणार आहे. शहरात मागच्या काही महिन्यांत पाणी पुरवठ्याच्या विस्कळीत नियोजनामुळे बीडकरांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. आता पाच दिवसांआड पाणी पुरवठा होणार असल्याने बीडकरांना दिलासा मिळणार आहे. मात्र काही भागांत दहा दिवसांआडच पाणी पुरवठा होणार आहे.

शहरात २०५० पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरुन अमृत अटल योजना हाती घेण्यात आली. मात्र, योजनेच्या कामांतील विस्कळीतपणा, पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे नियोजनशून्य काम यामुळे बीडकर परिसरात भरपूर पाणी असूनही पाणी पुरवठ्याबाबत त्रस्त होते. कुठे तीन आठवड्याला तर कुठे पंधरवड्याला पाणी येत असल्यामुळे बीडकरांचे हाल होत होते. दरम्यान, शहेंशाह नगर येथील पाण्याच्या टाकीवरून परिसरातील शहींशाह नगर, चंपावती नगर, खासबाग, झमझम कॉलनी, आतेफ नगर, विद्यानगर पश्चिम, सह्याद्री हॉटेल परिसर तर बार्शी रोड दूध डेअरी येथील पाण्याच्या टाकीवरून बार्शी रोड, बाजीराव नगर, इमामपूर रोड, बिलाल नगर, प्रकाश आंबेडकर नगर, धानोरा रोड येथील पाण्याच्या टाकीवरून संत नामदेव नगर पूर्व, पश्चिम, कृषी नगर, पंचशील नगर, स्वराज्य नगर, शिवाजी नगर, दत्त नगर, मित्र नगर, आनंद नगर, चाणक्यपुरी, ग्रामसेवक कॉलनी, कालिका नगर, गोरे वस्ती,

रोशनपुरा, नगर रोड येथील पाण्याच्या टाकीवरून श्रीराम नगर, जवाहर कॉलनी, शिक्षक कॉलनी, बिंदुसरा कॉलनी, आदर्श नगर, बागवान गल्ली, बालेपीर, भक्ती कन्स्ट्रक्शन, आय.टी.आय मागे., शाहूनगर येथील पाण्याची टाकीवरून पोस्टमन कॉलनी, चक्रधर नगर, सय्यदवाडी, शाहूनगर, पांगरी रोड, पिंपरगव्हाण आदी परिसरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाली धरणावरून पाणीपुरवठा केला जाणाऱ्या पेठ बीड, मोमीनपुरा, शुक्रवार पेठ, चांदणी चौक, सुभाष रोड, सहयोग नगर, बुंदेलपुरा, कारंजा, बलभीम चौक, धांडे गल्ली, कटकटपुरा, राजुरी वेस, बशीर गंज आदी परिसरात सहा दिव

सांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच ईदगाह नाका पाणी टाकीवरून पूरग्रस्त कॉलनी, माऊली नगर, गांधीनगर, शिवणी रोड, सय्यदअली नगर, मोहम्मदीया कॉलनी, इस्लामपुरा, दुबे कॉलनी, तेलगाव नाका, गजानन नगर, एकता कॉलनी आदी परिसरात यापूर्वी १७ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. तो आता १० दिवसांआड करण्यात आला आहे. पाणी पुरवठा विभागाचे काम प्रगती पथावर असून भविष्यात बीड शहराचा पाणी पुरवठा किमान तीन दिवसाला करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

शहरातील उशिरा पाणी पुरवठ्याच्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळे अमृत अटल योजनेचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. आता पाच दिवसांआड शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. भविष्यात जसे जसे काम पूर्णत्वाकडे जाईल तसा हा पाणी पुरवठा तीन दिवसाला करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

- डॉ. योगेश क्षीरसागर, माजी नगरसेवक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT