नांदेड : आज फसव्या जाहिरातींचे प्रमाण वाढले असून याबाबत विद्यार्थी जनजागरण करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी टीव्हीवरच्या जाहिराती जरूर पहाव्यात परंतु त्या जाहिरातीमध्ये फसवेगिरी काय आहे. हे सुद्धा त्यांनी बारकाईने जाणून घ्यावे, फसव्या जाहिराती शोधून काढाव्यात. या बाबीकडे लक्ष देण्यासाठी विद्यार्थी जागरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न करावेत, असे आवाहन ग्राहक पंचायतच्या राज्य सहसंघटक मेधा कुलकर्णी यांनी केले.
रविवारी (ता. १९) रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या जिल्हा अभ्यास वर्गात श्रीमती कुलकर्णी बोलत होत्या. या प्रसंगी राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड, उस्मानाबाद जिल्हा सहसंघटक हेमंत वडणे, पुणे जिल्हा ग्राहक मार्गदर्शन केंद्र प्रमुख, ग्राहक पंचायतचे राज्य सचिव किरण वाघमारे, प्रा. डॉ. बा. दा. जोशी, प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, जिल्हाध्यक्ष अरविंद बिडवई, जिल्हा संघटक बालाजी लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - वाळू माफियांवर मोक्का लावा, अन्यथा...
विद्यार्थी, पालक व गृहिणींनी जागरुक राहणे आवश्यक
त्या पुढे म्हणाल्या की, या फसव्या जाहिरातींचा अभ्यास करून त्यापासून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी जाहिराती पाहताना, विद्यार्थी, पालक व गृहिणींनी जागरुक राहणे आवश्यक आहे. टीव्हीवरील जाहिराती या विद्यार्थी व गृहिणींच्याच पाहण्यात येतात. त्यांनी जागरुक राहून फसव्या जाहिराती निदर्शनास आल्या तर त्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत पाठपुरावा केला तरच फसव्या जाहिरातीपासून नागरिकांची फसवणूक होणार नाही. या निमित्ताने जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांमार्फत संघटनेच्या कार्य वाढीसाठी विविध पैलूंवर प्रबोधन करण्यात आले.
ग्राहकांची सेवा म्हणजेच खरी ईश्वर सेवा
देव फक्त मंदिरात, देवळातच नाही, तर रंजल्या-गांजल्या पीडित जनताजनार्दनांमध्ये त्याचे वास्तव्य असते. अशा जनताजनार्दनरूपी ग्राहकांची सेवा म्हणजेच खरी ईश्वर सेवा होय, संघटनेचे अधिष्ठान असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या विचारावर आधारीतच संघटनेचे कार्य चालते. अशा अभ्यास वर्गातून रचनात्मक कार्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरित करणे हे संघटनेचे नित्य कार्य आहे. असे सूतोवाच राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी आपल्या उद्बोधनात केले. या अभ्यास वर्गात पुणे जिल्हा ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र प्रमुख अनिल जोशी यांनी महारेरा या विषयावर विस्तृत भाष्य केले. तर उस्मानाबाद जिल्हा सह-संघटक श्री हेमंत वडणे यांनी 'माहितीचा कायदा' या विषयावर मार्गदर्शन केले.
येथे क्लिक करा - नांदेडात शेती उत्पन्न वाढीसाठी शेतीशाळा
'ग्राहक राजा जागा हो'
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त संघटनेतर्फे शाळा- कॉलेजात दिल्या जाणाऱ्या विद्यार्थी ग्राहक जागरण व्याख्यानावर आधारित 'ग्राहक राजा जागा हो' या विषयावरील निबंध स्पर्धेत 'राणी लक्ष्मीबाई हायस्कूल मधील' गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाण- पत्र वितरित करण्यात आले. अभ्यास वर्गास शहर, जिल्हा व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.