file photo 
मराठवाडा

हजाराची लाच घेताना बिट जमादार अटकेत

सकाळ वृत्तसेवा

गंगाखेड(जि.परभणी) : शेतीच्या वादाचे प्रकरण मिटविण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना बिट जमादार सुरेश बाजीराव पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता.१५) रंगेहाथ पकडले.
पोलिस हवालदार रमेश बाजीराव पाटील (रा. पोलिस वसाहत, गंगाखेड) यांनी मालेवाडी (ता. गंगाखेड) येथे दहा जून रोजी तक्रारदार यांच्यासोबत त्यांच्या भावाचे शेतीच्या वादावरून भांडण झाले होते. गंगाखेड पोलिसात त्यांच्यावर तसेच त्यांचे दोन मुले व सून यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. प्रकरणाचा तपास पोलिस जमादार सुरेश बाजीराव पाटील यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी १३ जून रोजी तक्रारदारास पोलिस ठाणे येथे बोलावून सदरील प्रकरण मिटवून घेण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास सापळा रचून सुरेश बाजीराव पाटील यांना एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.


हेही वाचा ...

धान्य काळा बाजारप्रकरणातील
आरोपींची चौकशी
गंगाखेड :
धान्याच्या काळा बाजारातील मुख्य आरोपी विजय कुमार शर्मा याला सोमवारी (ता. १५) पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यात बोलावले होते.
शहरातील शनिवार बाजार परिसर येथील श्रद्धा ट्रेडिंग कंपनीतून रेशनचा गहू व तांदळाचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस व महसूलच्या पथकाने ता. सहा जूनला छापा टाकला होता. या ठिकाणी तब्बल दहा लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विजय कुमार शर्मा, ट्रकचालक मुरलीधर बेले यांच्यावर गुन्हा ता. आठ जून रोजी दाखल झाला. परंतु, मुख्य आरोपी विजयकुमार शर्मा तेव्हापासून फरार होता. सदरील प्रकरणात प्रशासकीय पातळीवरील अनेक घडामोडी घडल्या सदरील प्रकरणाचा तपास गंगाखेडऐवजी जिंतूरचे परीक्षाविधीन आयपीएस अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून मुख्य आरोपीस ताब्यात घेऊन धान्याच्या काळ्या बाजारातील प्रकरण संदर्भात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

हेही वाचा ...
 

२८ नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही
परभणी :
मास वापरणाऱ्या व सामाजिक अंतर न राखणाऱ्या २८ नागरिकांवर कारवाई करून महापालिकेने दोन हजार आठशे रुपये दंड वसूल केला.
महापालिकेच्या प्रभाग समिती (अ ) अंतर्गत आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अपना कॉर्नर ते नटराज रंगमंदिर परिसरात वाहन चालकांनी मास्क न लावल्यामुळे एकूण दोन हजार क्ष ८०० रुपये दंड वसूल केला. यानंतर विनामास्क फिरू नये. पथक प्रमुख राजू झोडपे, मोहियोद्दिन जब्बार खान, दिलीप वाहुळे, किरण गायकवाड, मोहम्मद गौस, लक्ष्मीकांत गायकवाड यांच्या सहकार्याने कार्यवाही केली. शहरताील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्याचे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.
... 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT