परभणी : शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी त्वरीत कर्जाचे वाटप करावे व राज्य सरकारने घोषित केलेली कर्ज माफी त्वरीत करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने सोमवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.
राज्यामध्ये सध्या मान्सुनचे आगमन झाले आहे. परभणी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्यामुळे बऱ्यापैकी खरीप हंगामास सुरुवात झाली आहे. परभणी जिल्ह्यात कापसाची खरेदी अतिशय संथ गतीने सुरु असल्याने शेतकऱ्यांचा कापूस आणखी ही घरातच पडून आहे. काहींना मजबुरीने व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागत आहे. कापूस विक्री न झाल्याकारणाने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे टाकले आहे. पेरणीचे दिवस सुरु झाल्याने शेतकऱ्यांना खते, बी. बियाणे, औषधी खरेदी करावे लागतात. पण त्यांच्याकडे आर्थिक भांडवल नसल्याकारणाने शेतकरी संकटात सापडला आहे.
बॅंकेसमोर आंदोलन करण्यात येईल
बॅंका शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यासमोर पेरणी कशी करायचा हा प्रश्न पडला आहे. पीक कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना बॅंका अपमानित करण्याच्या घटना जर घडल्या तर भारतीय जनता पक्षाच्यावतीने संबंधित बॅंकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा पवित्रा भाजपने घेतला आहे.
हेही वाचा : सोयाबीनच उगवलेच नाही; मग सुरू झाला तक्रारींचा ओघ
पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी त्वरीत पीक कर्जाचे वाटप व राज्य सरकारने घोषित केलेली कर्जमाफी त्वरीत करावी या मागणी भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मंगला मुदगलकर, मोकिंद खिल्लारे, नंदुकिशोर दरक, रितेश जैन, सुरेश भुमरे, मोहन कुलकर्णी, सुनील देशमुख, संजय शेळके, दिनेश नरवाडकर आदी सहभागी झाले होते.
कर्जमुक्तीसाठी पावले उचलावीत
सरकार झोपेत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना कळत नाहीत. अशीच परिस्थिती राहील तर राज्यातील बळीराजा अधिकच कोलमडला जाईल याची भिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांच्या पिक कर्ज व कर्जमुक्तीसाठी पावले उचलावीत अन्यथा आम्हाला या पेक्षाही जास्त उग्र पध्दतीने आंदोलन करून सरकारला जागे करावे लागेल.
- आनंद भरोसे, महानगराध्यक्ष, भाजप, परभणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.