मराठवाडा

‘या’ मंडळाने सरावातूनच साधला ताल-सूर

प्रमोद चौधरी

नांदेड :

हरी तुझे नाम
गाईन अखंड...
यावीन पाखंड 
नेणे काही...

जगद्‍गुरु संत तुकाराम महाराजांच्या  या अभंगानुसार काबरानगातील महिला नियमित हरीनामामध्य दंग होतात. शिवाय समाजातील ज्वलंत समस्यांवरही प्रबोधन करून समाज परिवर्तनासाठी प्रयत्न करीत आहेत.

साधारणतः २००३मध्ये नलिनी देशपांडे आणि सरिता खानकोजे यांनी राधाकृष्ण महिला भजनी मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून अखंडित भजनगायन सुरु आहे. मोर चौकाजवळ काबरानगर आहे. येथे राधाकृष्ण मंदिर आहे. याठिकाणी या महिला नियमित भजन करतात. मंडळातील सर्वच सदस्यांनी कुठेही गायनाचा क्लास केलेला नाही. नियमित सरावातूनच त्यांनी ताल आणि सुराची सुरेख गुंफण केलेली आहे. 

भजनासोबतच समाजप्रबोधनही
नियमित भजनासोबतच स्त्रीभ्रूणहत्या, हुंडा, शिक्षण, स्वच्छता, पाणी, वृक्षारोपण अशा ज्वलंत विषयांवरही मंडळातील सदस्या भारुडांच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहेत. स्वतःच्या बळावर या सदस्यांना भजनस्पर्धाही गाजविलेल्या आहेत. अनेक बक्षिसे मिळालेली असल्याने सर्वांचा आत्मविश्‍वास देखील वाढल्याचे त्यांच्या गायनातून स्पष्टपणे जाणवते. दोनवेळा ई-टीव्हीच्या भजन स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस पटकावले. कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धांतही नियमित सहभाग असतो. २०१० मध्ये परभणी आकाशवाणी केंद्रावरही मंडळाचा कार्यक्रम गाजलेला आहे.

मंगळागौरीचा स्वतंत्र ग्रुप
राधाकृष्ण महिला भजनी मडंळाने ‘संस्कृती’ या नावाने मंगळागौरीच्या खेळांचा स्वतंत्र ग्रुप तयार केलेला आहे. डोहाळे जेवण, बारसे आदी कार्यक्रमांतही मंडळातील सदस्यांचा हातखंडा आहे. दत्त, कृष्ण मंदिरात दर गुरुवारी भजन होते. नवरात्रमध्ये रोज सकाळ आणि संध्याकाळी देवीच्या गाण्यांचे कार्यक्रम नऊही दिवस होतात. रामनवमी, कृष्णाष्टमी उत्सवही दणक्यात साजरे केले जातात.

मंडळातील महिला सदस्या
सुहासिनी पांडे, मंजूषा चिमकोडवार, अनिता हल्लाळीकर, सायली देशपांडे, विभावरी हर्गे, सुनीता कान्नव, छाया येळणे, अनिता ठाकूर, सुनंदा मुळे, सुभांगी कंधारकर, जयश्री उद्‍गीरकर, लता लुटे, मनीषा कुलकर्णी, सुधा देशपांडे यांचा समावेश आहे. त्यांना तबल्यावर महेश शिंदे तर हर्मोनिअमवर दीपाली शिंदे वेळोवेळी साथ देतात.

मंडळाचा इतिवृत्त पुस्तकरूपात
मंडळातील पहाडी आवाजातील गायिका सुनिता नाईक यांचे अचानक निधन झाले. मंडळातील सर्वच सदस्यांना ताला-सुरामध्ये कसं गायन करायचे, हे सुनीताताईंनी शिकविले. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ राधाकृष्ण महिला भजनी मंडळाच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा इतिवृत्त सुधाकर नाईक यांनी पुस्तकरुपाने प्रकाशित केलेला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू राज्यात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT