Marathwada News Sakal
मराठवाडा

Marathwada News: अंबाजोगाई-केज रस्त्यावर बसचा अपघात; बसच्या चालक, वाहकासह वीस-पंचवीस प्रवासी जखमी

Marathwada News: बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या खड्डयात जाऊन पलटी झाल्याची घटना घडली, जखमींवर केज व अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू..

रामदास साबळे

केज, ता बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या खड्डयात जाऊन पलटी झाल्याची घटना सोमवारी (ता.३०) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई-केज रस्त्यावर चंदनसावरगाव जवळ घडली. या अपघातात बसचा चालक, वाहक यांच्यासह बसमधील वीस ते पंचेवीस प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघात घडताच पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून केज व अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अपघातात जिवीतहाणी झाली नाही. घटनास्थळी पोलीस व परिवहन महामंडळाचे कर्मचारी दाखल झाले होते.

तालुक्यातील अंबाजोगाई-केज रस्त्याने छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदपूर आगाराच्या बसच्या (एमएच-२०/बीएल-२५७२) चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस चंदनसावरगाव शिवारातील हाॅटेल जवळ रस्त्याच्या लगत असलेल्या खड्डयात जाऊन पलटली. अपघातावेळी बसमधून जवळपास सत्तावन्न-अठ्ठावन्न प्रवासी प्रवास करत होते. अपघात घडताच रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी आपले वाहने थांबवून व जवळच शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी बसमध्ये अडकलेल्या बसचालक, वाहक व प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. तोपर्यंतच काही जणांनी पोलीस व शासकीय रूग्णवाहिकेला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक चेन्नाशेट्टी पोलीस कर्मचाऱ्यासह तर रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. बसमधून बाहेर काढलेल्या बसचालक, वाहक यांच्यासह वीस पंचेवीस जखमींना केज व अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्वच जखमींची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी सांगितले.

बस अपघातातील जखमींमध्ये बसचालक केंद्रे (पूर्ण नाव समजू शकले नाही), हरिश्चंद्र नामदेव मुसळे (बसवाहक), अनिल ज्ञानोबा गवळी, उमर हबीब जफर, रामलिंग मन्मथ शिवपुजे, खतीब मजहर आतार, विठ्ठल शिवाजी कांबळे, रावसाहेब शंकर गुडेवार, श्रीमती काशीबाई रावसाहेब गुडेवार, येडबा अंबाजी जोगदंड, वर्षा जगदीश खंदारे व मुज्जीत इस्माईल शेख या जखमींचा समावेश आहे. यांच्यावर केज शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर बसचालक हरिश्चंद्र मुसळे यांच्या डोक्याला काच लागून जखमी झाल्याने सीटी स्कॅन चा रिपोर्ट येईपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमींची नावे समजू शकली नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

SCROLL FOR NEXT