buy our kidney liver and eyes demand of goregaon farmers to chief minister eknath shinde agri product price farm
मराठवाडा

आमची किडणी, लिव्हर व डोळे विकत घ्या,गोरेगावच्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

विठ्ठल देशमुख

सेनगाव : तालुक्यातील दहा शेतकऱ्यांनी किडणी, लिव्हर, डोळे व इतर अवयव विकत घ्या अशी मागणी निवेदनाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. सोयाबीन व कापसाला भाव मिळत नाही. पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

खरीप हंगामातील पिकांमध्ये दरवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ग्रामीण भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळाला नाही. सोयाबीन, कपाशी आदी पिकाना योग्य भाव दिला जात नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेले पहायला मिळत आहे. सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव येथील दहा शेतकऱ्यांनी किडणी ७५ हजार रुपये दहा नग, लिव्हर ९० हजार रुपये दहा नग, डोळे २५ हजार रुपये दहा अशा प्रकारे स्वतःचे अवयव विकत घ्या अशी मागणी तहसीलदारामार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदद्वारे करण्यात आली आहे.

खासगी, सरकारी बँकेचे कर्ज, सावकारी कर्ज व इतर उसनवारी करून आम्ही खरीपात पेरण्या केल्या आहेत. मात्र नंतर पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन पीक उध्वस्त झाले. बोंडअळी लागल्यामुळे कापूस सुध्दा उध्वस्त झाला. आणि थोडंफार पीक आमच्या पदरी पडले. त्याला योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे आम्ही बँकेचे कर्ज परतफेड करायचे तरी कसे असा प्रश्न आम्हा शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

सोयाबीन, कापूस उध्वस्त झाला, दुष्काळ पडला, पिक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, अनुदान नाही. आम्ही पीक कर्ज भरायचे तरी कसे, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी आमचे अवयव विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमचे अवयव खरेदी करून आमचे बँकेचे कर्ज परतफेड करावे. अशी मागणी या निवेदनात केली आहे. या निवेदनावर गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी, नामदेव पतंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT