Child Marriage Sakal
मराठवाडा

Child Marriage : अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी लातुरात नवरदेवासह २०० वऱ्हाडींवर गुन्हा दाखल

Latur Latest News : पोलिस लग्नमंडपात दाखल झाल्याचे पाहताच काही वऱ्हाडी मंडळी भीतीने पसार झाले.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : अल्पवयीन मुलीचा विवाह सुरू असल्याची माहिती मिळताच लातूर पोलिसांचे पथक अवघ्या काही मिनिटांत चक्क लग्न मंडपात पोचले. नवरी मुलगी ही अल्पवयीन असल्याचे समजताच पोलिसांनी नवरदेवासह, दोन्ही बाजूंचे नातेवाईक, पुजारी, फोटोग्राफर, स्वयंपाकी यांच्यासह २०० वऱ्हाडी मंडळीविरुद्ध रविवारी (ता. ३०) गुन्हा दाखल केला.

पोलिस हेल्पलाइनवर (११२) शहरातील खाडगाव रस्ता परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह घडवून आणला जात असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी तत्काळ चाइल्डलाइनच्या पदाधिकाऱ्यांना ही बाब सांगितली. पोलिस पथक लग्नमंडपात पोचले. पोलिस लग्नमंडपात दाखल झाल्याचे पाहताच काही वऱ्हाडी मंडळी भीतीने पसार झाले.

यावेळी पोलिसांनी मुला-मुलींचे नातेवाईक यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वधू ही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी वधू-वरांसह त्यांच्या नातेवाइकांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. नवरी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असूनदेखील विवाह लावून दिल्यामुळे नवरदेव, दोन्ही बाजूंचे नातेवाईक,

लग्न जमवणारे, वधू-वराचे मामा, पुजारी, छायाचित्रकार, स्वयंपाकी अशा २०० वऱ्हाडी मंडळी यांच्या विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अन्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चाइल्डलाइनच्या अलका संमुखराव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, चाइल्डलाइन यांनी एकत्रितपणे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT