case registered against Assistant Commissioner of Social Welfare for not providing government jury in serious crimes Sakal
मराठवाडा

Dharashiv News : गंभीर गुन्ह्यात शासकीय पंच उपलब्ध करुन न देणाऱ्या समाज कल्याणच्या सहायक आयुक्तवर गुन्हा दाखल

गंभीर गुन्ह्यात पंच उपलब्ध करुन न दिल्याच्या कारणावरून येथील समाजीकन्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता. २५) धुलीवंदनाच्या रात्री धाराशिव शहरातील दोन धार्मिक गटात तुंबळ दगडफेक झाली होती.

शीतलकुमार शिंदे

धाराशिव : गंभीर गुन्ह्यात पंच उपलब्ध करुन न दिल्याच्या कारणावरून येथील समाजीकन्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी (ता. २५) धुलीवंदनाच्या रात्री धाराशिव शहरातील दोन धार्मिक गटात तुंबळ दगडफेक झाली होती.

यात कांही पोलिसही किरकोळ जखमी झाले होते. या घटनेचा घटनास्थळ पंचनामा व जप्ती पंचनामा करण्यासाठी दोन शासकीय पंच उपलब्ध करून देण्यास संगण्यात आले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झालेल्या घटनेबाबत जिवे मारण्याचा प्रयत्न व हिंदु मुस्लीम जातीय दंगलीचा गंभीर गुन्हा धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे.

या प्रकरणी घटनास्थळ पंचनामा व जप्ती पंचनामा करण्यासाठी दोन शासकीय पंच उपलब्ध करुन देण्यासाठी समाज कल्याणचे सहायक आयुक्त बी. जी. आरवत यांना सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी, मुलत: असे कर्मचारी पुरविण्याबाबत तरतुद नसल्याचे पत्र संबंधितांना देत, शासकीय पंच पुरविले नव्हते.

दरम्यान दोन धार्मिक गटात झालेल्या दगडफेकीचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. आशा प्रकरणी शासनाचे आदेश असतानाही अरवत यांनी शासकीय पंच पुरविले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करुन आदेशाचे उल्लघंन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या आशयाची तक्रार सहायक पोलिस निरीक्षक दिनेश उत्तमराव जाधव यांनी गुरुवारी (ता. २८) दिली आहे. त्यानुसार धाराशिव शहर पोलीस ठाण्यात १८८, १८७अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी समाज कल्याणचे सहायक आयुक्त आरवत यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशी तरतूद नसल्याचे यापूर्वीही वारंवार लेखी पत्र दिलेले आहे. या प्रकरणातही त्यांनी तसे लेखी पत्र दिले आहे. त्यांच्याकडून वारंवार सहकार्य नाकारण्याचे प्रकार घडत होते. परवा झालेली घटना गंभीर होती. शेवटी नाईलाजाने हा गुन्हा दाखल झाला आहे.

- स्वप्नील राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, धाराशिव.

काय आहे कलम १८७, १८८ :

भारतीय दंड संहितेच्या कलम १८७ मध्ये असे म्हटले आहे की, जर एखाद्या सार्वजनिक सेवकाला कायदेशीररित्या आवश्यक असताना मदत करण्यात अयशस्वी झाल्यास, त्यांना कारावास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते. एखाद्या गुन्ह्याला प्रतिबंध करणे किंवा एखाद्या गुन्हेगाराला पकडणे यासारख्या विशिष्ट हेतूंसाठी मदतीची मागणी केल्यास, शिक्षा अधिक कठोर असू शकते.

कलम १८८ : निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याचा किंवा तोतयागिरी करण्याचा अपराध करील त्याला, एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT