बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवत विशेष म्हणजे कोरोनाच्या सावटामुळे यंदा ऑनलाईन पद्घधतीने नुकताच दसरा मेळावा घेतला. मेळावा जरी ऑनलाईन पद्धतीने घेतला असला तरी ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला तिथे मात्र कोणतेही नियम पाळले न गेल्याचे सांगून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातूल संताप व्यक्त केला आहे. "गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे, असं ट्वीट मध्ये त्या म्हटल्या आहे.
पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथे ऑनलाईन दसरा मेळावा घेतला. परंतु अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये 40 ते 50 जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्स पाळलं नाही. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे.
याबाबत पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणतात की, अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. विशेष म्हणजे परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले. तर गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पंकजा मुंडे या भगवान बाबा यांच्या जन्मगावी म्हणजे सावरगाव घाट येथील दसरा मेळावा घेतात. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा ऑनलाईन झाला. पंकजा मुंडे यांनी सावरगावात येऊन भगवान बाबांचे दर्शन घेत सावरगावातून समर्थकांना संबोधित केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू आहेत, असं असताना सावरगावात मेळावा नसूनही पंकजा येणार असल्याने शेकडो समर्थक जमले होते. म्हणून आपत्ती निवारण कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पंकजा मुंडे, महादेव जानकर, राज्यसभा खासदार भागवत कराड, पाथर्डीच्या आमदार मोनिका राजुरे, जिंतूर आमदार मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आणि अन्य 40-50 जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर कलम 188, 269, 270 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.