औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) : येथील ज्योतिर्लिंग नागनाथाचा यात्रा महोत्सव या वर्षी कोरोना प्रादुर्भावाने रद्द करण्यात आल्याने महाशिवरात्रीच्या नंतर तिसऱ्या दिवशी चंद्र दर्शनानंतर साजरा होणारा नागनाथाचा रथोत्सव रविवारी (ता. १४) अल्प कर्मचारी व पुजाऱ्याच्या उपस्थितीत पाच प्रदक्षिणा मारुन साधेपणाने साजरा करण्यात आला.
दरम्यान दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा रथोत्सव साजरा होतो. परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे नागनाथाचा यात्रा उत्सव रद्द करण्यात आल्याने रुढीपरंपरेनुसार नागनाथाचे धार्मिक विधी अल्प कर्मचारी व पुजारी यांच्या उपस्थितीत साधेपणाने कोरोनाचे नियम पाळत साजरे होत आहेत. त्यामुळे रविवारी रात्री झालेला भगवान नागेश्वराचा रथोत्सव साधेपणाने साजरा केला.
दरम्यान रात्री नऊ वाजता संस्थांनचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी फुलांनी सजविलेल्या रथामध्ये बसवलेल्या भगवान नागेश्वराचे पूजन करुन नागनाथ रथोत्सवाच्या पहिल्या फेरीला सुरुवात केली. यात मोजक्याच कर्मचाऱ्यांनी रथ ओढला त्यामुळे हजारोच्या संख्येने साजरा होणारा रथोत्सव मात्र भाविकाविना सुना- सुना लागत होता. दरम्यान, मंदिर परिसरात भाविक दाखल होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक गणेश राठोड, मुंजाजी वाघमारे, सुवर्णा वाळके, जमादार अफसर पठाण, गणेश नरोटे, खिजर पाशा, यशवंत गुरुपवार, इक्बाल शेख, ज्ञानेश्वर गोरे, अमोल चव्हाण यांच्यासह मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.