Chhagan Bhujbal News 
मराठवाडा

Chhagan Bhujbal News: बीडकरांचा गोंधळ अ्न भुजबळांनी भाषण आवरतं घेतलं! नेमकं काय झालं?

Sandip Kapde

Chhagan Bhujbal News: बीड येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत गोंधळ झाला. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ बोलत असताना खाली कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी भूजबळ यांनी दोन मिनिटात भाषण संपवतो, अशी विनंती देखील केली. मात्र कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरुच होता.

बीडमधील अजित पवार गटाची सभा सर्व नेत्यांच्या भाषणामुळे लांबली. अजित पवार सर्वात शेवटी बोलेले. त्याआधी छगन भुजबळ भाषणासाठी आले होते. भुजबळ शरद पवार यांच्यावर टीका करत होते. यावेळी खाली कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला.

कार्यकर्ते बऱ्याच वेळेपासून अजित पावर यांचे भाषण ऐकण्यासाठी थांबले होते. मात्र सभा लांबल्यामुळे गोंधळ झाला. यामुळे छगन भुजबळ यांना भाषण आवरते घ्यावे लागले. कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर भुजबळ यांनी काही मिनिटातच भाषण संपवले.  

कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे लोकांना अजितदादांना ऐकायचे होते. ही वस्तुस्थिती असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. तर शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे भुजबळ यांना भाषण आवरतं घ्यावं लागलं, अशी देखील चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  सोशल मीडिया उपाध्यक्ष योगेश सावंत यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

भुजबळ काय म्हणाले?

छगन भुजबळ यांनी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. छगन भुजबळ यांनी पहाटेच्या शपतविधीबद्दलही भाष्य केले. "दादांनी सकाळी शपथविधी घेतला, तर म्हणे गुगली टाकली होती. राजकारणात अशी गुगली असते का ? गुगलीत स्वत:च्या प्लेअरला आऊट करायचं असतं का?", असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.

शरद पवार यांनी जेव्हा येवल्यात सभा घेतली होती, तेव्हा त्यांनी येवल्यातील जनतेची माफी मागितली होती. यावर भुजबळ म्हणाले की, "साहेब म्हणतात, माझी चूक झाली, माफी मागतो. कारण उमेदवार चुकीचा दिला. तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार, सगळ्यांनी सह्या केल्या आहेत. तुम्हाला जर माफी मागाची असेल तर ५४ ठिकाणी माफी मागावी लागेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SCROLL FOR NEXT