Raju Shinde esakal
मराठवाडा

Raju Shinde : राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न निष्फळ? बैठकीनंतर शिंदेंनी नाराजी केली उघड; म्हणाले, 'तेच' आम्हाला ज्ञान शिकवत असतील तर...

संतोष कानडे

छत्रपती संभाजी नगरः भाजप नेते तथा छत्रपती संभाजी नगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे भाजपचं कमळ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेतील, असं जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजप नेत्यांनी दिवसभर केलेल्या मनधरणीचा राजू शिंदेंवर काहीही परिणाम झालेला नाहीत. आपला निर्णय ठाम असल्याचं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलून अंतिम निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.

राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात जाऊ नये तर मुंबईला येऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी यासाठी रावसाहेब दानवे हे राजू शिंदे यांची मनधरणी करत होते. छत्रपती संभाजी नगरमधल्या विमानतळावरच्या बैठकीनंतर संभाजीनगरमध्ये आणखी एक बैठक संपन्न झाली. रावसाहेब दानवे, अतुल सावे आणि राजू शिंदे यांची बैठक झाल्यानंतर राजू शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राजू शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न फेल ठरल्याचं दिसून येत आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरवणार असल्याचं शिंदे म्हणाले. जवळपास दोन ते अडीच तास राजू शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. बैठकीत राजू शिंदे यांचा नाराजीच सूर कायमच असल्याचं दिसून आलंय.

दरम्यान, राजू शिंदे यांचा रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पक्ष प्रवेशापूर्वीच राजू शिंदे यांचे शहरात बॅनर झळकले आहेत. भाजप पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे.

काय म्हणाले राजू शिंदे?

गेली अनेक वर्ष ज्या पक्षात राहिलो, परिवारात राहिलो.. परिवारात राहून इतका संघर्ष कुठे असतो का? इतका संघर्ष मी केला. कार्यकर्त्यांचं किंवा पदाधिकाऱ्यांचा म्हणणं ऐकून घ्यायचं नाही.. भाजपचं काम चांगलं असूनसुध्दा जर आम्हाला दुय्यम वागणूक दिली जात असेल आणि ज्यांच काम ग्राउंड लेव्हलला काहीच नाही.. तेच आम्हाला ज्ञान शिकवत असतील तर अशा लोकांचे काम करून फायदा काय? कुठपर्यंत आम्ही अशा लोकांचे ओझे वहायचे? असा सवाल राजू शिंदे यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'या' शिल्पकाराने घडवलाय राहुल गांधींनी अनावरण केलेला कोल्हापुरातील शिवरायांचा पुतळा; जाणून घ्या रायगड कनेक्शन

ती कुठेय? सगळे आले पण ती नाही दिसली, बिग बॉस मराठीचा प्रोमो पाहून नेटकरी करतायत तिची चौकशी

Bigg Boss Marathi 5 : सूरज की निक्की कोण आहे व्होटिंग ट्रेंड्समध्ये आघाडीवर ? घ्या जाणून या सीजनचे फायनल वोटिंग ट्रेंड्स

Used Car Buying Tips: सणासुदीत रिसेल कार खरेदी करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही फसवणूक

Latest Marathi News Live Updates : वीज दरवाढीचा व्यावसायिकांना ‘शॉक’; प्रतियुनिट 2 रुपये कमी करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT