धाराशिव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० जानेवारीला तर उपमुख्यमंत्री अजित पवार १३ जानेवारीला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यातील अनेक प्रश्न आ वासून बसले आहेत. ते सोडवण्याची आपण तसदी घ्यावी. आमच्या समस्येकडे लक्ष द्याच... अशी आर्त हाक जिल्ह्यातील नागरिकांतून दोन्ही नेत्यांना केली जात आहे.
धाराशिव शहरातील भुयारी गटार योजनेचे काम रेंगाळले आहे. गुजरातमधील एका कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले आहे. कामाच्या तुलनेत पैसे न मिळाल्याने कंपनीने काम थांबविले आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर खडी फोडून महिना झाला आहे. तरीही कामे होत नाहीत. यामुळे शहरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील कचरा उचलला जात नाही. दररोज ५० टन कचरा शहराच्या पोटात कुजत आहे.
दररोज उचलला जाणारा कचरा मागील वर्षापासून अधूनमधून उचलला जात आहे. तर तीन महिन्यांपासून शहरातील कचरा उचललेला नाही. शहरात साथरोगाचा फैलाव होत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. सामान्य जनता वेळेवर तुमच्या करचा भरणा करीत आहे. असे असताना या जनतेला कचऱ्यात फेकल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. तुमच्याकडे निधी नाही की जिल्ह्यातील राजकीय नेते तो निधी खर्च करण्यात असमर्थ आहेत. याचे उत्तर शहरातील जनता तुम्हाला मागत आहे. तुम्ही येणार आहेत, तरा या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरातील जनता करीत आहेत.
जिल्हा बँक,पीकविम्याचा निर्णय घ्याच
जिल्हा बॅंक ही सर्वसामान्य नागरिकांची अर्थवाहिनी आहे. पण, १५ वर्षांपासून बँकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. ठेवीदारांच्या ठेवी मिळत नाहीत. किंबहुना शेतकऱ्यांना कर्ज वाटप होत नाही. राज्यातील अनेक बँका आर्थिक अडचणीत आल्या. त्यांना मोठी आर्थिक मदतही झाली. मात्र धाराशिव जिल्हा बँक अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे.
सध्या राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकेवर जिल्ह्यातील नागरिकांची आर्थिक उलाढाल होत आहे. पण, या बँका सामान्यांना जवळ करीत नाहीत. बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संगीत खुर्चीचा खेळ सुरू होता, अशीही चर्चा होती. आता तुम्ही दोघेही सत्तेत आहेत. केंद्रातही एकाच विचाराचे सरकार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेला आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.