file photo 
मराठवाडा

१५ हजार नागरिकांनी नोंदविली मते

सकाळ वृत्तसेवा

परभणी : ‘ओडीएफ प्लस प्लस’, ‘टू स्टार सिटी’चा दर्जा मिळविल्यानंतर परभणी शहर महापालिकेने काही दिवसांपासून ‘सिटीझन्स फिडबॅक’ वर लक्ष केंद्रित केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता. ३१) महापालिकेचे शेकडो अधिकारी, कर्मचारी नागरिकांमध्ये ॲपच्या जनजागृतीसह प्रतिसाद मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. या वेळी जवळपास १५ हजार नागरिकांनी आपली स्वच्छतेबाबतची मते नोंदविली. प्रतिसादामुळे शहराचे गुणांकण व दर्जामध्ये वाढ होणार आहे.


परभणी महापालिकेचे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाचे हे चौथे वर्ष आहे. २०१७ पासून पालिका या स्पर्धेत सहभागी झाली असून आतापर्यंत सर्वेक्षणात तपासल्या जाणाऱ्या विविध बाबींमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० ला ता. ३१ जानेवारी २०१९ ला सुरवात झाली होती. ता. ३१ जानेवारी २०२० हा सर्वेक्षण स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. स्वच्छ शहर स्पर्धेत सहभागी झालेल्या महापालिकेच्या उपक्रम व स्वच्छतेची राज्य पातळीवरील तीन पथकांनी वेळोवेळी येऊन पाहणी केली आहे. ‘एसएस २०२०’ ॲपवरील नोंदणीची तपासणी करणारे पथक, महापालिकेने शहर ‘टू स्टार’ घोषित केल्यानंतर त्याची तपासणी करणारे पथक व ‘ओडीएफ प्लस प्लस’ दर्जा घोषित केल्यानंतर त्याची तपासणी या पथकांनी केली असून या पथकांनी शहरातील पथदिवे व स्वच्छतेच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या उपक्रमांची पाहणी केली.


नागरिकांची संख्या १५ हजारांपर्यंत पोचली
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अखेरच्या दिवशी पालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी बाजारपेठा, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी जावून एसएस २०२० या ॲपबाबत जनजागृती करीत होते. नागरिकांनी त्या ॲपच्या माध्यमातून आपली मते नोंदवावीत यासाठी प्रयत्न करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नागरिकांचादेखील मोठा प्रतिसाद मिळाला व मत प्रदर्शित करणाऱ्या नागरिकांची संख्या १५ हजारांपर्यंत पोचली आहे.

पालिकेच्या वर्षभरातील स्वच्छताविषयक सुधारण
शहराचे बाह्य स्वरूप बदल्यासाठी पालिकेने शहरात सर्व बाजूंनी येणाऱ्या रस्त्यांवर फलक लावले असून चौकांचे रंगरंगोटी करून सुशोभीकरण केले आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक अथवा सार्वजिनक ठिकाणे स्वच्छ, कचरामुक्त राहतील याचा प्रयत्न चालवला आहे. दुभाजकांमध्ये फुलझाडे लावली, रस्ते स्वच्छ ठेवून चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला, त्यात चांगले यस मिळाले आहे. वर्गिकृत कचरा संकलित करण्यासह शहरातील उकीरडे बंद करून ओला-सुका कचरा साठवण्यासाठी लिटरबीन लावल्या आहेत. तर बोरवंड येथे घनकरचा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करून तेथे दररोज दहा टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. या निश्चितच पालिकेच्या जमेच्या बाजू आहेत.



स्वच्छताविषयक सुधारणा होईल
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत येणाऱ्या सर्व बाबी परिपूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असून त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात यश मिळविले आहे. जवळपास १५ हजार नागरिकांनी आपली स्वच्छतेबाबतची मते नोंदविली आहेत. ॲपच्या माध्यमातून आपली मते नोंदविणे आवश्यक आहे. त्यामुळे सुधारणा करणे शक्य होणार आहे. महापालिकेने राबविलेल्या स्वच्छताविषयक उपक्रमामुळे निश्चित सुधारणा होईल.

-रमेश पवार, आयुक्त, महापालिका, परभणी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT