NND18KJP03.jpg 
मराठवाडा

नांदेडला अवेळी पावसासह गारपीट

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यातील ग्रामिण भागात बुधवारी (ता. १८) सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास अवेळी पावसाने दणका दिला. हा पाऊस नांदेड शहर, देगलूर, लोहा, मुक्रमाबाद आदी भागात झाला. अधापूर तालुक्यातील दाभड परिसरात गारपीट झाली आहे. या पावसामुळे काही ठिकाणी विज गायब झाली. तर कापणीसाठी आलेला गहू व हरभरा पिकांचे यामुळे नुकसान झाले आहे. 

भारतीय हवामान खात्याचा होता अंदाज 
नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसापासुन ढगाळ वातावरण होते. यामुळे दुपारी गर्मी जाणवत होती. दरम्यान भारतीय हवामान विभागाने मराठवाड्यात बुधवारी (ता. १८) अवेळी पाऊस, गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. यामुळे बुधवारी (ता. १८) दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर यात बदल होवून पावसाला सुरवात झाली. सायंकाळी सहा ते साडेवाजताच्या दरम्यान शहरातील वजीराबाद, शिवाजीनगर, आयटीआय, श्रीनगर, तरोडा नाका, चैतन्यनगर आदी भागात जोरदार पाऊस झाला. 

वादळामुळे वीज गुल
या पावसामुळे तरोडा नाका, पाटबंधारेनगर, राज कॉर्नर, चैतन्यनगर परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. शिवाजीनगर भागातील रोडची लाईट बंद झाली होती. ग्रामिण भागातही अवेळी पावसाने झोडपून काढले. नरसी परिसरात विजेच्या गडगडासह पाऊस झाला. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे विज गायब झाली होती. अर्धापूर तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तालुक्यातील दाभड शिवारात गारपीट झाली. या वादळी वारे, पाऊस व गारपीटीमुळे कापणीला आलेल्या गव्हासह, हरभरा, उन्हाळी ज्वारी, केळी या पिकाचे नुकसान झाले आहे.

लोहा परिसरात जोरदार पाऊस 
लोहा शहर आणी परिसरात बुधवारी ( ता.१८) सायंकाळी साडेसहा वाजता मेघ गर्जनेसह पाऊस झाला. या पावसामुळे भाजीपाला, गहू, हळद उत्पादकांची एकच धांदल उडाली. 
बुधवारी दुपारी लोहा परिसरात उखाडा दाणवत होता. अशातच सायंकाळी पावसाला सुरवात झाली. यामुळे हळद, कडबा, फळबागांना या अवकाळीचा फटका बसला.

बरबडा परीसरात वादळी पाऊस 
बरबडा परिसरात बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कापणीला आलेल्या ज्वारी, हरभरा व गव्हाचे पिके आडवी पडली आहेत. हा पाऊस बरबडा, पाटोदा, काहाळा, घुंगराळा, आंतरगाव, मनुर आदी गावात झाला. 

मालेगावला गारांचा पाऊस
मालेगाव (ता. अर्धापूर) येथे वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढल्याने गहू, हरभरा, हळद, केळी, पपई आदी पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारच्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाने याची दखल घेऊन तत्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT