Parali Vidhnsabha: परळीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे धनंजय मुंडेंविरोधात काँग्रेस दंड थोपटणार आहे. आज याची घोषणा काँग्रेस तर्फे करण्यात आली.यावेळी परळीकरांनी मत दिली. मात्र लोक स्वत: मोठे झाले, त्यांनी परळीचा विकास केला नाही असेही सांगण्यात आले.
सर्वांगीण विकास व प्रभू वैद्यनाथाच्या नगरीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सर्व धर्मीय सर्वसामान्य माणूस यांना सुख समाधान आनंदी व भयमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी आपण निवडणूक लढवणार आहोत अशी घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी मंगळवारी (ता.२३) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
यावेळी आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या खासदार रजनी पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी रमेशजी चेन्नीथला यांना भेटून उमेदवारी मागीतली आहे असे देशमुख यच्याकडून सांगण्यात आले.
हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे समविचारी पक्ष व संघटनेतील नेते आणि कार्यकर्ते यांचा ओढा वाढत आहे. अनेक जण काँग्रेस पक्षाच्या संपकांत आहेत. काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुक ताकदीने लढविणार आहे. बारामती, लातूर, पुणे शहराच्या धरतीवर शहरासह संपूर्ण मतदारसंघाचा विकास करणे आणि शहर व मतदारसंघात शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण निवडणूक लढविणार आहोत.आपण निवडणूक लढवावी अशी परळी विधानसभा मतदारसंघातील सर्वधर्मिय मतदार आणि सर्वसामान्य माणसाची प्रामाणिक इच्छा आहे.
त्यांच्या भावनेचा आदर करून तसेच परळीचा सर्वांगिण विकास, श्रीक्षेत्र प्रभु वैद्यनाथ यांच्या नगरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण परळी विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी तर्फे निवडणूक लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष सय्यद हनीफ, तालुका अध्यक्ष अनिल जाधव , उपाध्यक्ष, शुभम देशमुख ,वैजनाथ गडेकर, इथे शाम खातिब, प्रवक्ते बद्दरभाई, ज्येष्ठ नेते प्रकाश देशमुख,दीपक शिरसाट, समंदर खान पठाण रणजित देशमुख,निर्मळ पाटील इत्यादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
परळी वैजनाथ हे सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या शहरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. रेल्वे, वीज निर्मिती सारखे महत्त्वाचे प्रकल्प असून ही आज परळी शहरात कायद्याचे राज्य नाही. शिक्षणाच्या सोयी व रोजगार उपलब्ध नाही. अधिकारी, नौकरदार, व्यापारी, महिला, मुली, विद्यार्थी, अल्पसंख्यांक हे सर्व घटक आज दहशतीखाली जीवन जगत आहेत. शहरातील श्रीमंत, ऐपतदार लोक अंबाजोगाई, लातूर, पुणे येथे कुटुंबासह स्थलांतरित झाले आहेत. शेतकरी अनुदान व पीक विम्यापासून वंचित आहेत.नेहमीच परळीकरांच्या आशिर्वादावर केवळ स्वतःच मोठे झालेल्यांना सलग सत्तेत राहून ही परळीचा विकास करता येवू नये ही मोठी शोकांतिका असल्याची टिका मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर या पत्रकार परिषदेत राजेसाहेब देशमुख यांनी केली.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या खासदार रजनी पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी रमेशजी चेन्नीथला यांना भेटून उमेदवारी मागण्यात आली आहे. तसेच महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार श, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे , प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेऊन महाविकास आघाडी तर्फे अधिकृत उमेदवारी मागणार आहोत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.