उमरगा (जि.उस्मानाबाद) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सचिवपदी विठ्ठलसाई साखर कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव यांची निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मुरुमच्या विठ्ठल मंदिराच्या सभागृहात सत्कार समारंभ पार पडला.  
मराठवाडा

शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम 'काँग्रेस'ने केले

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) :  देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या पन्नास वर्षांच्या विकासाची रणनिती आखणाऱ्या काँग्रेस पक्षामुळे आज देशात दिसणारा विकास, उद्योगधंदे, शेतीची प्रगती, रस्ते, रेल्वे, शिक्षण, आरोग्य, कारखान्याचे जाळे निर्माण झाले. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने (Congress Party) काम केले. त्यात निष्ठेने काम करणाऱ्या (Osmanabad) कार्यकर्त्यांचे योगदान आहे. काँग्रेस पक्षाला चढउतार, जय - पराजय नवीन नाही. सध्याच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे आव्हान पेलत कार्यकर्त्यांनी पक्षाला पुन्हा उभारी देण्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे, असे मत प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील (Basawaraj Patil) यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सचिवपदी विठ्ठलसाई साखर कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव यांची निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी (ता.२९) मुरुमच्या विठ्ठल मंदिराच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी मंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील, उमरगा जनता बँकेचे अध्यक्ष रामकृष्णपंत खरोसेकर, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. दिपक जवळगे, तालुकाध्यक्ष ॲड. सुभाष राजोळे, उमरग्याच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, मुरुमच्या नगराध्यक्षा अनिता अंबर, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, लोहाऱ्याच्या सभापती हेमलता रणखांब, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, धनराज हिरमुखे, डॉ. विक्रम जीवनगे, अग्निवेश शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा संगिताताई कडगंचे, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, विजयकुमार सोनवणे आदींची उपस्थिती होती. श्री.चव्हाण म्हणाले की, देशाच्या चौफेर विकासाबरोबरच तळागाळाच्या घटकातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धीचा पहाट निर्माण करण्यासाठी पक्षाने काम केले आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असल्याने त्याला बळ देण्यासाठी प्रयत्न झाले.

निष्ठेचे फळ मिळाले !

मंत्रिमंडळाच्या यादीत नाव असल्याने शपथविधीसाठी  सहकुटुंब गेलो पण शपथविधी झाला नाही. ऐनवेळी नाव वगळण्यात आले. परंतु नाराज न होता पक्षावरील निष्ठा कायम ठेवत  काम केलो म्हणून आज पक्षाने प्रदेश कार्याध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली. काँग्रेस पक्षात निष्ठा महत्वाची आहे, असे सांगून बसवराज पाटील यांनी श्री. भालेराव यांनाही निष्ठेचे फळ मिळाले, या पदाला ते न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

अन् भालेराव भावूक झाले !

एका सामान्य, गरिब आणि मागासवर्गीय कुटुंबियातील कार्यकर्त्याला पक्षाने मोठी जबाबदारी दिली. असे सांगत असताना दिलीप भालेराव भावूक झाले. बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करताना समाजकारण, राजकारणातले अनेक पैलूचा उलगडा करत अनेकांना न्याय देता आला. यापुढेही पक्षाचे काम निष्ठेने करत कार्यकर्ते जोडण्याचे काम करणार असल्याचे श्री. भालेराव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT