Latur bribe Case sakal
मराठवाडा

Latur bribe Case : लाच घेताना शिपाई जाळ्यात

Latur crime : लातूरमधील अंगणवाडी मदतनीसाच्या पदावर नियुक्ती देण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना शिपाई भगवान बनसोडे याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : अंगणवाडी मदतनीसच्या रिक्त पदावर नियुक्ती देतो म्हणून एकाकडून पन्नास हजारांची लाच घेणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील (नागरी) एका शिपायास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी बुधवारी (ता. नऊ) ताब्यात घेतले. शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शासनाच्या येथील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालयाकडून अंगणवाडी मदतनिसांच्या जागा निघाल्या होत्या. या जागेसाठी तक्रारदार हे पात्र असल्याने त्यांनी नियुक्तीसाठी अर्ज भरला होता. पदाचा निकाल जाहीर होऊन तक्रारदार यांना प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आले होते.

त्यानंतर तक्रारदार यांना ता. एक ऑक्टोबर रोजी शिपाई भगवान बनसोडे याने फोन केला. औसा येथील अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून रिक्त पदावर नियुक्ती देणार आहोत, असे त्याने तक्रारदाराला सांगितले. या पदाच्या नियुक्तीच्या अनुषंगाने तक्रारदार हे ता. चार ऑक्टोबर रोजी बनसोडेला भेटले, त्यावेळी बनसोडे याने तक्रारदाराकडे ८० हजारांची मागणी केली.

तक्रारदाराने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर बुधवारी ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून ही लाचेची रक्कम बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात शासकीय पंचासमक्ष घेतली; तसेच तीस हजार रुपये तक्रारदार हे कामावर रुजू झाल्यानंतर घेण्याचे मान्य केले आहे. यात पोलिसांनी ५० हजार लाचेची रक्कम घेताना तातडीने बनसोडे याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT