Bamu Bamu
मराठवाडा

औरंगाबाद विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारंभ २५ जूनला

कुलपती भगतसिंग कोश्यारी अध्यक्षस्थान भूषविणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती

संदीप लांडगे

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारंभ ‘एआयसीटीई’ चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे यांच्या प्रमुख उपस्थिती येत्या २५ जून रोजी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या समारंभाची तयारी विद्यापीठाने सुरु केली आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६० वा दीक्षांत समारंभ १३ फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आला. कोविडच्या पाश्र्वभुमीवर राज्यातील सर्वच विद्यापीठाचे दीक्षांत समारंभ हे ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६१ वा दीक्षांत समारंभही येत्या २५ जून रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पध्दतीने होईल. यावेळी ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे यांचे दीक्षांत भाषण होईल. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी अध्यक्षस्थान भुषविणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची प्रमुख उपस्थिती राहील.

प्र.कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्यासह सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहील, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी दिली. दरम्यान, कार्यक्रमाच्या तयारीसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून जूनच्या पहिल्या आठवडयात कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक होईल.

दीक्षांत समारंभासाठी अर्ज मागवले-
मराठवाडा विद्यापीठाकडून ऑक्टोबर/नोव्हेंबर २०१९ आणि मार्च/एप्रिल २०२०मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत उत्तीर्ण व पदवीस पात्र स्नातकांचा ६१ वा दीक्षांत समारंभ जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयामध्ये घेण्यात येणार आहे. येत्या दीक्षांत समारंभासाठी पदवीस पात्र स्नातकांकडून उपस्थितीत व अनुपस्थितीत पदव्यांचा अनुग्रह करण्यासाठी पदवी आवेदनपत्र मागविण्यात येत आहेत. करिता, ऑक्टोबर/नोव्हेंबर २०१९ आणि मार्च/एप्रिल २०२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या व त्या-त्या पदवीस पात्र अशा स्नातकांनी पदवी आवेदनपत्र १० जून पर्यंत ऑनलाईन भरून विद्यापीठाच्या परीक्षा विभागात व्यक्तिश: अथवा टपालाने प्राप्त होतील या बेताने पदवी आवेदनपत्रासाठी लागणा-या सर्व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावीत.

यामध्ये पदवी व पदविका अभ्यासक्रम, पदव्यूत्तर अभ्यासक्र, पदव्यूत्तर अभ्यासक्रमानंतरचे अभ्यासक्र, पीएच.डी प्रमाणपत्र तसेच जे स्नातक पदवीस पात्र आहेत व ज्यांनी परीक्षा आवेदनापत्रासोबत पदवी आवेदनपत्र सादर केलेली आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा आवेदन दाखल करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन डॉ.योगेश पाटील यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT