Umarga News esakal
मराठवाडा

प्रवाशांचा संयम पाहू नका,नागरिकांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

नागरिकांनी इतके दिवस संयम बाळगुन संपकरी कर्मचाऱ्यांना पाठींबा दिला आहे. त्याच नागरिकांचा प्रवास सुखकर व सुलभ व्हावा यासाठी संपकरी कर्मचाऱ्यांनी दिलदारपणा दाखवावा.

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून सुरु असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनामुळे (ST Worker Strike) प्रवाशांचा प्रवास खडतर झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. मात्र कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहु नये. प्रवाशी दैवत आहेत, त्यांचा विचार करावा. इतर राज्यातील बससेवा व्यवस्थित सुरू ठेवावी, या बसेसना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी उमरगा (Umarga) येथील नागरिकांनी बुधवारी (ता.१९) तहसीलदार यांच्यामार्फत राज्य परिवहन महामंडळाकडे (MSRT) निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदार राहुल पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून बेमुदत आंदोलन केल्याने राज्यातील सर्व बसेस जागेवर थांबून आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहे. यावर कोणाचेही दुमत नसावे. पण परिवहन सेवा खोळंबल्याने राज्यातील करोडो लोकांचा प्रवास अतिशय खडतर झाला आहे. खासगी वाहनधारकाकडून प्रवाशांची प्रचंड लुट होत आहे.(Cooperate Passengers, Citizens Appeal To ST Strike Workers)

त्यातच इतर राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसच्या कर्मचाऱ्यांना आपल्या राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांकडून नाहक त्रास दिला जात आहे. त्यांना धमकावले जात आहे. ही अत्यंत दुःखत बाब आहे. नागरिकांनी इतके दिवस संयम बाळगुन संपकरी कर्मचाऱ्यांना पाठींबा दिला आहे. त्याच नागरिकांचा प्रवास सुखकर व सुलभ व्हावा यासाठी संपकरी कर्मचाऱ्यांनी दिलदारपणा दाखवावा. किमान इतर राज्यातील परिवहन मंडळाच्या गाड्यांना प्रवासाला परवानगी दिली जावी व त्यांना संरक्षण दिली जावे. संपकरी कर्मचाऱ्यांनी वृद्ध, महिला, लहान मुले व प्रवाशी यांचा विचार करून इतर राज्यातील बस गाड्यांना विरोध करु नये. (Osmanabad)

विरोध व अडवणूक करून महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनातील तुमच्या विषयी असलेली दया भावना संपवून रोष घेऊ नये. अशीच अडवणूक होणार असेल तर आम्ही सुजाण नागरिक म्हणून कर्मचाऱ्यांविरुद्ध आंदोलन करू, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सचिन सुतके, व्यंकटराव सूर्यवंशी, सिद्धार्थ सूरवसे, प्रशांत गायकवाड, शिवराज गावडे, महेश भोसले, अजहर अत्तार, सोहेल शेख, फेरोज पटेल, तन्वीर मुजावर, अरोद्दीन शेख आदींच्या सह्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT